अंकीता बाईलबोडे हिच्या कुंटबाला मनोधैर्य योजनेंतर्गत १० लक्ष रूपयांची आर्थिक मदत करा.
🔥खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून अँड. उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक करा
🔥 वर्धा जिल्ह्यातील मंजूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट येथेच व्हावेत यासाठी आग्रही मागणी
🔥वर्धा जिल्ह्यातील सोयाबीन पिकांवर ऍलो मोझेकमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करा
🔥 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार समीर कुणावार यांची मागणी
सिंदी (रेल्वे) : मुंबई येथे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार समीर कुणावार यांनी भेट घेत दिंनाक २ आक्टोबर २३ रोजी सेलू तालुक्यातील दहेगाव गोसावी येथे घरात घुसून हत्या झालेल्या मृतक अंकीता बाईलबोडे हिच्या कुंटबाला खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावार जिल्हा पोलिस अधीक्षक नरूल हसन यांनी दिलेल्या आश्वासनानुसार हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी राज्य सरकार तर्फे अँड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करून प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवावा तसेच तिच्या कुंटबाला मनोधैर्य योजनेंतर्गत १० लाख रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्याचप्रमाणे वर्धा जिल्ह्यातील मंजूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट येथेच व्हावे याकरिता स्मरणपत्र क्रमांक ८ देवून हिंगणघाट येथील वैद्यकीय महाविद्यालय प्रश्न तातडीने सोडवावा याकरीता चर्चा केली. वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट येथे देण्याकरिता निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी केली. तसेच वर्धा जिल्ह्यातील सोयाबीन पिकांवर आलेल्या ऍलो मोझेक, बुरशी, मूळकूज व करपा या रोगांमुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी सुद्धा यावेळी केली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मागण्यांवर चर्चा करत सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे कार्यसम्राट आमदार समीर कुणावार यांनी बोलतांना सांगितले.
दिनेश घोडमारे साहसिक न्यूज-24 सिंदी रेल्वे