अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ व दरमहा पेन्शन इतर प्रश्नासाठी , खाजगीकरण विरोधात लढा मजबूत करा – वंदना कोळणकर

0

प्रतिनिधी / वर्धा:

आयटक संलग्न अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन तालुका शाखा समुद्रपूर च्यावतिने काँ विजया पावडे यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक जिल्हा परिषद शाळा येथे दि.२३ मार्च रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संताप मेळावा पार पडला. मेळाव्याचे उदघाटन प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी अनिता भोयर यांनी शहिदे आझम भगतसिंग सुखदेव राजगूरु व सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला मालार्पन करुन केले, अतिथी म्हणून पर्यवेक्षिका हेमलता मानकर, चव्हाण उपस्थित होते. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ व दरमहा पेन्शन इतर प्रश्नासाठी , खाजगीकरण विरोधात लढा मजबूत करा , अंगणवाडी कर्मचारी युनियन जिल्हा सचिव वंदना कोळणकर यांनी व्यक्त केले
ते पुढे म्हणाले अंगणवाडी कर्मचाऱ्यांची केंद्र व राज्य सरकारच्या बजेटमुळे घोर निराशा झाल्यामुळे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती आझाद मैदानावर संताप मोर्चा काढत केंद्र व राज्य सरकारचा निषेध केला. यामध्ये हजारोंच्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाल्या होत्या.
गेल्या काही महिन्यांपासून अंगणवाडी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी सातत्याने आंदोलनात उतरल्या आहेत. मानधनात वाढ, मासिक पेन्शन, नवीन मोबाईल, दैनंदिन माहिती भरण्यासाठी मराठीमधील चांगले ॲप, आजारपणात रजा,लाभार्थ्यांना चांगला पूरक पोषण आहार, अंगणवाडी केंद्राच्या भाड्यात वाढ, किरकोळ खर्चासाठीच्या रकमेत वाढ, रिक्त जागांवर भरती, पदोन्नती आदी मागण्यावर तर केंद्र सरकारच्या बजेटने तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेच होते. आता राज्य सरकारने देखील त्याचीच पुनरावृत्ती केली .केंद्र सरकारने सार्वजनिक संस्थाचे खाजगीकरण करण्याचा सपाटा लावला.
खाजगीकरणाच्या विरोधात तर योजना कामगारांच्या मानधनात वाढ दरमहा पेन्शन व इतर प्रश्नासाठी २८.२९ मार्च देशव्यापी संपात सहभागी व्हा असे आवाहन करीत काँ कोळणकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले
स्थानिक अडीअडचणीचा आढावा घेण्यात आला. समुद्रपूर प्रकल्पात सेविकांचे टि.ए.बिल थकीतअसून इतर स्थानिक प्रश्न पंधरा दिवसात निकाली काढण्यात येथील असे आश्वासन प्रकल्प अधिकारी यांनी दिले .
सुनंदा आखाडे, हिरा बावने, प्रभा भगत, उतरा शेवडे, छाया गाठे , माला कुत्तमारे , पुष्पलता येलेकर, कविता नगराळे , आशा गौरखेडे , नंदा हनवते, माला बहादूरे , वैशाली गाठे, सविता तडस , वंदना मोहीतकर, पुष्पा वैद्य , निता एकोनकर, सिंधू नारनवरे, रेनु गायकवाड, गिता कडूकर, इंदिरा निखाडे, सुनिता बांगरे , अर्चना झिल्लारे यांनी विचार व्यक्त केले
संचालन सुनंदा आखाडे आभार समारोप हिरा बावने यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!