अंमली पदार्थ विक्रेत्याकडून हिंगणघाट पोलिसांनी केला ४४३ ग्रॅम गांजा जप्त..
हिंगणघाट : १७ ऑक्टोंबर रोजी शहरातील अंमली पदार्थ विक्रेत्याला ४४३ ग्रॅम गांजासह पोलीसांनी रंगेहाथ पकडून ताब्यात घेतल्याची घटना काल सोमवारी स्थानिक टाका ग्राऊंड येथे घडली.
पोलीसांनी याप्रकरणी मिळालेल्या माहितीवरून नाकेबंदी करीत शहरातील महात्मा फुले वॉर्ड येथील कुप्रसिद्ध आरोपी राकेश उर्फ सिद्धार्थ जनबंधू (३३) या आरोपीस अटक केली व त्याचे ताब्यातून एकूण ८ हजार ८०० रुपये किंमतीचा ४४३ ग्राम गांजा हा अंमली पदार्थ जप्त केला.गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने गुन्ह्यात वापरलेली एम एच-३२/एल- ३३३३ बजाज पल्सर दुचाकीसह दोनशे रुपये रोख असा एकूण ६९ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.सदरची कारवाई ठाणेदार मारोती मुळूक, सहायक पोलिस निरीक्षक अनिल आळंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रमेश मिश्रा गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोहवा प्रवीण देशमुख यांचे सहकाऱ्यांनी केली.
ईकबाल पहेलवान सहासिक न्यूज-24 हिंघणघाट