अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने वृक्षारोपण सेवाग्राम :

साहसिक न्युज24
प्रतिनिधी/ सेवाग्राम:
देशच नव्हे जगात पर्यावरणाचा प्रश्र्न गंभीर बणला आहे.यातून मार्ग काढण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन हाच एकमेव मार्ग लोकांसमोर आहे.पावसाळा सुरू झाला असून एक जबाबदारी आणि योगदान म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने वर्धा येथील श्रीनगर लेआउट,तुळशी वृंदावन गार्डन व हनुमान मंदिर वार्ड क्रमांक 2 मध्ये महीला जिल्हाअध्यक्ष शैलजा साळुंके यांच्या माध्यमातून वृक्षारोपण कार्यक्रम मंगळवारला आयोजित करण्यात आला.
यामध्ये,कडुलिंबृक्ष, आवळी,बेल,वड,चाफा इ.झाडांची लागवड करण्यात आली. या प्रसंगी महिला जिल्हाअध्यक्ष शैलजा साळुंके ,भारती चांदुरकर, भाग्यश्री निघडे, अमीता शिंदे,कुंदा घाडगे,भारती साळुंके,शरयू वांदीले,मनिषा हिवरे,संगीता बढे,शीतल बढे,शारदा केने,वीणा दाते,दिपाली वांढरे,अनिता तुरीले,ज्योती शेटे,मेघा जाधव, देवढे,सुजाता वघळे, शिल्पा वघळे,सुमन भानारकर, रेखा कुंभारे, आशा सालंकार, तायडे,इंगोले,जिल्हाअध्यक्ष अरुण जगताप सर, कार्याध्यक्ष प्रा.उमाकांत डुकरे,जिल्हासंघटक राजेश वाकडे,महेश काशीद,रहाटे,नरेश शिंदे, राजेश देवढे.दिनेश रहाटे, पंडीत,फरकाडे,स्वप्नील वघळे इत्यादी उपस्थित होते.