अखेर गैवर्तन करणाऱ्या एसटीचे चालक-वाहक निलंबित.
विद्यार्थिनींशी अरेरावी करणे एसटीच्या चालक-वाहकाला पडली महागात.
देवळी : चार दिवसांपूर्वी नागपूर-नांदेड या बसच्या चालक-वाहकाने वर्धा येथे शिकणाऱ्या देवळीतील विद्यार्थिनी व महिलांना देवळी येथे थांबा नसल्याचे खोटे कारण सांगून अरेरावीची भाषा करत अपमानास्पद वागणूक देऊन बसच्या खाली उतरण्यास सांगितले होते.परंतु नागपूर-नांदेड या बसचा देवळी येथे थांबा असल्याने विद्यार्थिनी व महिला चालक वाचकांचा विरोध झुगारून बसमध्ये बसून राहिल्या.बस देवळी येथे आली असता चालक-वाहका कडून विद्यार्थिनी व महिलांशी झालेल्या गैरवर्तणुकीच्या विरोधात तक्रार देण्यासाठी वाहकाला बस देवळी पोलीस स्टेशन मध्ये घेण्यास सांगितले. व देवळी पोलीस स्टेशन मध्ये वाहक भरत रमेश परते,रा.नागपूर व चालक संजय राजेशराव मेहत्रे,रा.वडनेर यांच्या विरुद्ध तक्रार देण्यात आली. याआधी बसेस परस्पर बायपासने जाणे,विद्यार्थिनी,महिला व प्रवाश्यांना देवळी थांबा नाकारणे, चालक-वाहकांची वाढती अरेरावी या गंभीर समस्ये विरोधात युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे सातत्याने लढा देत आहे. याही प्रकरणात पीडित विद्यार्थिनीं व महिलांना किरण ठाकरे यांनी मदत करून एसटी महामंडळाच्या वरिष्ठ पातळीवर सतत पाठपुरावा केला.आज विभागीय वाहतूक अधिकारी विजय धायडे यांनी त्या नागपूर- नांदेड या बसचे हिंगणघाट आगाराचे चालक-वाहक दोघांनाही निलंबित केल्याची माहिती दिली.” नागपूर-नांदेड बसचा देवळी येथे बस थांबा असतांना विद्यार्थिनींना प्रवास नाकारणे, विद्यार्थीनी व महिलांशी अरेरावी करून कर्तव्यात कसूर केल्यामुळे चालक- वाहकाला निलंबित करण्यात आले.”विजय धायडे, विभागीय वाहतूक अधिकारी,वर्धा
“देवळी येथे थांबा असतानाही देवळीतील विद्यार्थीनी, महिला व प्रवाश्यांना देवळीकरिता प्रवास नाकारणे व बसेस परस्पर बायपासने जाणे हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. या निलंबनाच्या कारवाई नंतर बायपास ने जाणाऱ्या बसचे चालक- वाहक या प्रकरणातून बोध घेतील ही अपेक्षा आहे.”
किरण ठाकरे,अध्यक्ष युवा संघर्ष मोर्चा, देवळी
सागर झोरे सहासिक न्यूज-24