अखेर बनावट दारूच्या अड्या सोनू ढाब्यावर देवळी पोलिसांनी मारला छापा
Byसाहसिक न्युज 24
प्रतिनिधी/ देवळी:
महापुरुषाची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्यात 1974 मध्ये दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला मात्र तब्बल 48 वर्ष उलटूनही ही दारूबंदी कागदावरच राहिल्याचे दिसून येत आहे देवळी तालुक्यासह शहरात सुद्धा मोठ्या प्रमाणात अवैद्य भेसळयुक्त बनावट देशी विदेशी दारूची विक्री केल्या जात आहे देवळी ते वर्धा रोडवर असलेल्या उड्डाणपुलाखाली असलेल्या सोनू धाब्यावर मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त बनावट देशी विदेशी दारू ची विक्री केल्या जात असते.याच धाब्यावर देवळी पोलिसांनी छापा मारून तब्ब्ल सात निपा देशी दारूने भरलेल्या किंमत 700 रु या सोनू द्याब्याच्या मालकावर हेमंत कापसे याच्या वरती गुन्हा दाखल केला आहे. तसेच ढाब्याचे मालक हेमंत कापसे हे नागरिकांच्या जिवाशी खेळत असून या धाबे मालकावर राज्य उत्पादक शुल्क मेहरबान का आहे असा प्रश्न तेथील नागरिकांना पडला आहे सोनू ढाबा मालक हेमंत कापसे राज्य उत्पादक शुल्क विभागाला महिन्याकाठी पंचेचाळीस हजार रुपये देत आहे यामुळेच राज्य उत्पादक शुल्क विभाग या सोनू ढाब्यावर कारवाई करण्यास हिम्मत करत नाही मग अशा राज्य शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यावर वरिष्ठ अधिकारी कारवाई करणार का तसेच सोनू ढाबा मालक हेमंत कापसे याच्यावर सुद्धा कारवाई करेल का की भेसळयुक्त दारू पिणाऱ्या नागरीकांचे मृत्यू झाल्यावरच या विभागाला जाग येईल असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे.