अधिस्विकृती समितीवर नियुक्ती झाल्याबद्दल प्रफुल्ल व्यास यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते सत्कार

0

अधिस्विकृती समितीवर नियुक्ती झाल्याबद्दल प्रफुल्ल व्यास यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते सत्कार

राज्य शासनाने नुकत्याच राज्य व विभागीय अधिस्विकृती समित्या जाहीर केल्या आहे. नागपूर विभागीय अधिस्विकृती समितीवर सदस्य म्हणून दै.तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल व्यास यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याहस्ते श्री.व्यास यांचा सत्कार करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, जेष्ठ पत्रकार प्रशांत देशमुख, प्रविण धोपटे, अजीज शेख, शशांक चतारे, प्रशांत अग्रवाल, सुनील गावंडे, संजय देसाई, अविनाश नागदेवे यांच्यासह विविध वर्तमानपत्रांचे पत्रकार, जिल्हा माहिती कार्यालयाचे कर्मचारी दिलीप बोंडसे, पंढरीनाथ लुटे, संजय चिटटवार आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन श्री.व्यास यांचा नियुक्तीबद्दल सत्कार केला व त्यांना शुभेच्छा दिल्या. राज्य व विभागीय अधिस्विकृती समिती, समितीचे कामकाज, पत्रकारांना देण्यात येणाऱ्या सुविधा याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती जाणून घेतली. जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड यांनी प्रास्ताविकातून शासनाच्यावतीने पत्रकारांना देण्यात येत असलेल्या सुविधांची माहिती दिली.

वर्धा प्रतिनिधी/अविनाश नागदेवे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!