अनुभव शिक्षा केंद्र वर्धा यवतमाळ अंतर्गत वर्धा येथे जिल्हा कोअर गट बैठक.

0

🔥अनुभव शिक्षा केंद्र वर्धा यवतमाळ अंतर्गत वर्धा येथे जिल्हा कोअर गट बैठक.

वर्धा,देवळी -/ अनुभव युवा मंच, अनुभव शिक्षा केंद्र अंतर्गत आंबेडकर गार्डन वर्धा येथे 19 मे 2026 ला जिल्हा कोर गटाची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये विशेष सहभाग हिंगणघाट तालुका वर्धा तालुका देवळी तालुका व सेलू तालुक्यातील युवकांचा सहभाग होता. या बैठकीत विशेष चर्चा व नियोजन करण्यात आले. युथ लीडरशिप बिल्डिंग कोर्स करिता युवकांची निवड तालुका नुसार करणे. व ग्रामीण भागेतील व ग्रामीण भागातील भागातील युवकांना संधी युवा नेतृत्व अभ्यासक्रम करिता निवड करणे. अनुभव युवा मंच कार्य वर्धा जिल्हात गतीने वाढविण्याकरिता जिल्हास्तरीय अनुभव युवा मंच एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करणे. अनुभव शिक्षा केंद्र मधील जोडलेल्या व्यक्तींमध्ये झालेल्या बदल व विकासाबाबत सक्सेस स्टोरी तयार करणे व त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करणे. युवकांचे अनुभव कट्टे गाव स्तरावर मजबूत करून स्थानिक प्रश्न सोडविण्याकरिता युवकांना तयार करणे. व नेतृत्व विकसित करणे. युवक मूल्य आधारित निर्माण व्हावा याकरिता मूल्य आधारित कार्यशाळा जास्तीत जास्त आयोजित करणे. युवकांना हायर एज्युकेशन कडे वळविणे. व जॉबच्या संधी उपलब्ध व्हाव्या याकरिता युवकांना मदत करणे. या बैठकीत वरील विषयावर कार्य क्रमाचे नियोजन आराखडा तयार करण्यात आला. जिल्हा बैठक मध्ये निकिता मनवर कार्याध्यक्ष जिल्हा कोर कमिटी यवतमाळ, अनुभव शिक्षा केंद्र यवतमाळ यांची एम ए डेव्हलपमेंट रांची झारखंड अजीम प्रेमजी युनिव्हर्सिटी यामध्ये निवड झाली. तसेच स्नेहा शेळके यांची गांधी फेलोशिप पिरामल फाउंडेशन करिता निवड झाली. या सक्सेस स्टोरी वर विशेष चर्चा झाली. व अभिनंदन करण्यात आले. अनुभव शिक्षा केंद्र ला जोडलेल्या युवकांचा सामाजिक मानसिक,राजकीय, शैक्षणिक विकास नक्की होतो. या बैठकीचा परिणाम.. युवकांमध्ये पुढाकार घेण्याची क्षमता विकसित झाली. युवकांचा नेतृत्व विकास होताना दिसून येते. मूल्य आधारित युवक तयार होत आहे. या बैठकीचे संचालन.. साथी करिष्मा मुनेश्वर अनुभव शिक्षा केंद्र वर्धा यवतमाळ, जिल्हा समिती वर्धा यांनी केले. विशेष सहभाग.. अविनाश राणे, खुशबू साहू, दिया परमार, विना झाडे, खुशिया मेघरे, करण बावणे यवतमाळ, भाग्यश्री, अंजली, आचल सेलकर, शुभम वरखडे, स्नेहाशेळके , बलराम जाधव यांनी केले. नियोजनात्मक ही बैठक यशस्वीरित्या सर्वांच्या सहभागातून वर्धा जिल्हा कोर कमिटी बैठक संपन्न झाली.

           सागर झोरे साहसिक       News-/24 देवळी वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!