अल्पवयीन बालीकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपिला सक्तमजुरीसह आजन्म कारावासाची शिक्षा.

0

हिंगणघाट : अल्पवयीन पिडीतेवर लैंगिक अत्याचार करण्या-या आरोपीस सक्तमजुरीसह जन्मठेपेची शिक्षा व २५ हजार रुपये दंड अशी दुहेरी शिक्षा स्थानिक न्यायालयाने थोटावली.तालुक्यातील वडनेर येथील ही घटना आहे, दि.२७ मार्च २०१८ रोजी आरोपीने धार्मिक प्रार्थनास्थळाचे ठिकाणी अल्पवयीन बालिकेवर जबरी अत्याचार केल्याची तक्रार पीडितेच्या आईने नोंदविली.वडनेर पोलिसांनी३७६ भां.द.वी सहकलम पोक्सो ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.अब्दुल लतीफ अब्दूला(३८) अशी ओळख असून या नराधमाने धार्मिक प्रार्थनास्थळाच्या खोलीमध्ये जेवणाचा डबा ठेवण्याचा बहाणा करून पीडितेच्या पाठीमागे खोलीत जावून पिडीतेसोबत लैंगिक अत्याचार केला.आरोपीविरुद्ध नमुद कलमाप्रमाणे गुन्हा नोंद केल्यानंतर त्याचे विरुद्ध सबळ पुरावा मिळाल्याने आरोपीविरुध्द दोषारोपत्र न्या.वर्षां पारगावकर यांचे न्यायालयात दाखल करण्यात आले.कोर्ट विद्यमान जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीमती. वर्षा बी. पारगावकर यांचे न्यायालयात सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ होते.सदर प्रकरणात सरकारतर्फे सरकारी वकील म्हणुन सौ. रश्मी व सोमवंशी व सरकारी अभियोक्ता दिपक वैद्य यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले व त्यांनी शासनातर्फे एकुण १८ सरकारी साक्षदार तपासले व प्रखरपणे बाजु मांडुन युक्तीवाद करीत आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध केला.सदर प्रकरणात तपासी अधिकारी म्हणुन सहायक पोलिस निरीक्षक डी.व्ही. झांबरे यांनी तपास पूर्ण करीत आरोपीविरुध्द सबळ पुरावे गोळा केले तर कोर्ट पैरवी अधिकारी म्हणुन पोलिस हवालदार म.ना.पो.शी. भावना गहुकर यांनी सदर प्रकरणात विशेष परिश्रम घेतले.न्यायाधिश वर्षा बी. पारगावकर यांनी सरकारी पक्ष व आरोपी पक्षांचे युक्तीवाद ऐकुन आरोपींविरुध्द भांदविचे कलम ३७६ भा. द.वी सहकलम पोक्सो ॲक्ट अंर्तगत आजन्म कारावासाची सक्तमजुरीसह शिक्षा तसेच २५ हजार दंड थोटावला, दंड न भरल्यास पुन्हा ३ महिने कारावासाची शिक्षा सुनावली.

ईकबाल पहेलवान सहासिक न्यूज-24 हिंघणघाट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!