अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून आरोपी फरार.
हाच तो मुख्य आरोपी शुभम पानबुडे
आर्वी : तालुक्यातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून आरोपी फरार झाल्याची घटना काल १३ ऑक्टोंबरला दुपारी दरम्यान घडली.
तालुक्यातील एका महाविद्यालयात शिकणारी १६ वर्षीय मुलगी प्रकृती बरोबर नसल्यामुळे महाविद्यालयातून सुट्टी घेतली. सुट्टी घेवून बसमधून गावालगत असलेल्या बस स्टँडवर उतरली. बस स्टँडवरून घरी जात असतांना अचानक पांढऱ्या रंगाची स्कार्पीओ कार उभी झाली. त्यात शुभम व अश्पाक नामक युवक बसले होते. शुभम गाडीतून उतरला व त्याने अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून गाडीच्या मधल्या सीटवर बसविले.आणि त्या मुलीला धमकी दिली तू आवाज केले तर चाकूने तुला व तुझ्या आईला मारून टाकीन. त्यानंतर आरोपींनी सुनसान ठिकाणी गाडी थांबविली. शुभमने त्या अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने दारू पाजली. तिचा गळा दाबला व लाथा भूक्याने मारहाण केली. शुभमने नशेच्या अवस्थेत असलेल्या त्या मुलीवर गाडीमध्ये अत्याचार केला. याबाबतची माहिती मुलीने आईला दिली असता. मुलीच्या आईने पोलीस स्टेशन मध्ये येवून तक्रार दिली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पोक्सो सेलच्या अंतर्गत विविध गुन्ह्याची नोड केली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी खंडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक धनश्री कुटेमाटे, जमादार जयपाल मून, गणेश खेडकर, सुरज मेंढे करीत आहे.
वृत्त लिहेपर्यंत दोन्ही आरोपी फरार आहे असून त्याच्या शोधार्थ पोलिसांचे विविध पथक पाठविण्यात आले आहे.
सहासिक न्यूज – 24 वर्धा