असं म्हणतात, मरावे परी किर्तीरुपी उरावे’.प्रा.पंकज चोरे यांना अखेरचा निरोप…

0

प्रा.पंकज चोरे.

अंत्ययात्रेतील गर्दीवरूनच मृत व्यक्तीचं व त्याच्या परिवाराचे मोठेपण कळतं.अंत्ययात्रा हिच मनुष्याच्या जीवनातील पोचपावती असते.

देवळी : काल शनिवार ९ डिसेंबर रोजी प्रा.पंकज चोरे यांचे हृदयविकाराच्या तिव्र धक्क्याने दुर्दैवी निधन झाले. प्रा.पंकज चोरे यांनी अतिशय परिश्रमातून उभ्या केलेल्या सृजन इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या आवारातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.चोरे हे नगर परिषद ज्यु.कॉलेज मध्ये इंग्लिश विषयाचे प्राध्यापक होते. सुरुवातीला या कॉलेजमध्ये विद्यार्थी प्रवेश घेण्याचे टाळत असत परंतु प्रा. पंकज चोरे या कॉलेज मध्ये आल्यापासून या कॉलेजची दशा व दिशा बदलली. सुरुवातीच्या काळात ते कॉलेज सुटल्यानंतर होतकरू विद्यार्थ्यांची घरी विनामूल्य शिकवणी घ्यायचे त्यामुळे कॉलेजचा रिझल्ट वाढायला लागला व विद्यार्थ्यांचा कल या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याकडे वळला. पुढे विद्यार्थ्यांची वेटींग लिस्ट लागणे सुरू झाले. ते कॉलेज सुद्धा त्यांनी त्यांच्या परिश्रमाने व सर्वांना कोणत्याही प्रकारची मदत करण्याच्या स्वभावामुळे नावारूपास आणले. ज्या काळात देवळीतील विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळेत शिक्षण घेण्याकरिता वर्धा, सावंगी येथे जावं लागत असे त्यावेळी चोरे यांनी सृजन कॉन्व्हेंट इंग्रजी शाळेची मुहूर्तमेढ देवळी येथे करून देवळीसह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून दिली.आज देवळी व ग्रामिण भागातील अनेक विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनामुळे मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत.अनेक पालक आपल्या पाल्याच्या भविष्याकरिता त्यांचा सल्ला घेत असत.तसेच चोरे यांनी मेहनत,जिद्द व चिकाटीने उभ्या केलेल्या सृजन मध्ये आज निर्सरी ते कॉलेज पर्यंत देवळी व ग्रामिण भागातील हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शैक्षणिक क्षेत्रात त्यांची अजून बरीच मोठी झेप घेण्याची इच्छा होती मात्र ती इच्छा त्यांची अपूर्ण राहली.प्रा.पंकज चोरे यांच्या अचानक जाण्याने देवळीतील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे.बऱ्याच वर्षांनी आज विराट शोकाकुल अंत्ययात्रा देवळीकरांनी अनुभवली.म्हणतात की मृत्यू हा देहाचा होतो, आत्माचा नाही आणि त्या व्यक्तीने केलेल्या कार्याचा पण नाही. आणि खरंच प्रा.चोरे यांनी केले शैक्षणिक आणि आणि सामाजिक कार्य कुणीही विसरू शकणार नाही. ते सर्वांनाच्याच आठवणीमध्ये नेहमीच जिवंत राहतील होतो विशेष म्हणजे अनेक महिला, विद्यार्थिनी, शिक्षिका ह्या स्मशानभूमीपर्यंत अंत्ययात्रेत सहभागी झाल्या व अनेकांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. शेवटी देवळीतील अनेक मान्यवरांनी शोकसभेत प्रा. पंकज चोरे  त्यांना  आठवणींना उजाळा देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या.व अखेरचा निरोप दिला.

सागर झोरे साहसिक न्यूज-24

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!