आईचे महत्व अगात आहे,आशुतोष अडोणी, अग्रवाल स्मृती व्याख्यानमालेचा समारोप.
देवळी : येथील अग्रवाल धर्म शाळेमध्ये दोन दिवशीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.जीवन जगण्याचा आधार आई या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन द्वारे समारोप करण्यात आला.या विषयावर व्याख्यान करण्याकरिता नागपूर येथील मुख्य वक्ते संस्कार भारतीचे साहित्य विभागाचे संयोजक आशुतोष अडोणी यांनी आईचे महत्व सांगणारे व्याख्याना द्वारे श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.आशुतोष अडोणी म्हणाले की आई असताना कोणतीही चिंता आणि काळजी नसते,मातृभाषा मातृभूमी आणि आईला दुसरे कोणतेही विकल्प नसते,आई हे पूर्ण शब्द आहे पूर्ण ग्रंथ आहे, महाविद्यालय आहे आई शब्दाची गहराई हे समुद्रापेक्षा जास्त आहे, आई शब्दाची उंची हिमालय पेक्षा ही उंच आहे,आईचे वर्णन शब्दात करणे शक्य नाही,आईला ओळखणाराच परमात्मा ला ओळखू शकतो,आईला कधी दुखवू नका तिचे आशीर्वाद नेहमीच घेत चला,आई एक नाव असते जगा वेगळा भाव असते, आई एक जीवन असते प्रेमळ मायेचे लक्ष नसते,आईला कधीच मरण नसतं आई म्हणजे नदीवरचे धरण असते यासारख्या ओळींनी जीवन जगण्याचा आधार आईच असते,असे प्रतिपादन केले. याप्रसंगी व्याख्यानमालेच्या समारोपीय कार्यक्रमाला खा. रामदास तडस अध्यक्ष स्थानी होते,साबाजी स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष मोहन बाबू अग्रवाल,सचिव प्राध्यापक डॉ गणेश मालदुरे,विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.यावेळी खा.रामदास तडस यांनी आपल्या अध्यक्ष भाषणामध्ये आई सर्व नात्यांमध्ये केंद्रस्थानी असल्याचे सांगितले आई मुळे नात्यांची साखळी जन्माला येते वृद्धिगंत होत राहते आई भोवतीच कुटुंबाची रचना आहे कुटुंबाची जन्मदात्री तसेच पोषण किर्ती तिला म्हटलं तरी अतिशोक्ती होणार नाही.असे अध्यक्ष भाषणातून सांगितले.या कार्यक्रमात देवळीच्या सर्व महाविद्यालयातून बीए च्या परीक्षेत प्रथम आलेली ज्ञानभारती कॉलेजची विद्यार्थिनी कु प्रतीक्षा सुरेश पवार आणि बीकॉम परीक्षेत सर्वप्रथम आलेली एस एस एन जे कॉलेजची विद्यार्थिनी पूजा संतोषराव सेवुतकर यांना स्वर्गीय अशोक कुमार अग्रवाल स्मृती पारोतोषिक देऊन सन्मान करण्यात आला.तसेच श्याम सुंदर अग्रवाल यांच्या जीवन कार्यावर ज्ञानेश्वर काळे यांनी प्रकाश टाकला तसेच कार्यक्रमाचे संचालन राहुल चोपडा यांनी केले तर,आभार प्रदर्शन मोहन बाबू अग्रवाल यांनी केले.यावेळी निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे, प्रहार समाज जागृती संस्थेचे कॅप्टन मोहन गुजरकर,बाविस्कर प्राध्यापक डॉ लांबट,केसरीमल कन्या शाळेचे पंडित,आधी अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सागर झोरे सहासिक न्यूज-24