आकाशवाणीवर थिरकणार आता हिंगणघाटचा तबला, तबलावादक विठ्ठल दानव यांची बी श्रेणीसाठी निवड…

0

🔥आकाशवाणीवर थिरकणार आता हिंगणघाटचा तबला,
तबलावादक विठ्ठल दानव यांची बी श्रेणीसाठी निवड.

हिंगणघाट -/ क्रीडा,साहित्य,चित्रकला मूर्तिकला व गायन क्षेत्रात वारसा लाभलेलं व आपलं नाव सातासमुद्रा पलीकडे घेऊन जाणारं नगर म्हणजे हिंगणघाट.याच नगरीतून अनेक कलावंत जन्मास आले व नावलौकिकास पात्र ठरले त्यातलाच एक नाव म्हणजे, तबलावादक विठ्ठल दानव.प्रसार भारती आकाशवाणी नागपूर केंद्राच्या वतीने तबला (सुगमसंगीत) वादन परीक्षणात आकाशवाणीचे बी श्रेणीचे अधिकृत कलावंत म्हणून त्यांची निवड करण्यात आली.अगदी लहानपणापासून आई- वडील, गुरुजनांचा आशीर्वाद,तबला वादनातील अविरत साधना, आकाशाला गवसणी घालण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती या सर्वांच्या बळावर तबल्यावरील थीरकरणाऱ्या बोटांनी हिंगणघाट नगरीच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला गेला असून संपूर्ण तालुक्यातून विठ्ठलजी दानव यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.आकाशवाणी नागपूर केंद्राद्वारे ऑक्टोंबर 2025 तबलावादनातील ताल परीक्षण (सुगमसंगीत) घेण्यात आले होते.या निवड परीक्षणात विठ्ठल दानव यांनी सादर केलेल्या सुगम संगीतातील नजाकत पूर्ण तबला वादनाची दखल घेत आकाशवाणीवरील दिग्गज परीक्षकांनी त्यांना यशस्वी घोषित करून आकाशवाणीचे प्राविण्य प्राप्त बी श्रेणी कलावंत म्हणून त्यांची निवड केली.या श्रेणीमुळे आता त्यांना शासकीय स्तरावरील तबलावादनातील कलावंत म्हणून मान्यता मिळाली असून,लवकरच आकाशवाणीवरून त्यांच्या तबलावादनाचे कार्यक्रम प्रसारित होणार आहे.हिंगणघाट नगरी ही कलावंतांची भूमी असून तिच्या बाबतीत “सौ घाट का एक ही घाट वह हिंगणघाट असं म्हणतात.याच नगरीतील एका खऱ्या कलावंताने आपल्या अविरत साधनेच्या बळावर मंदिरातल्या भजनापासून सुरू केलेल्या तबल्यावरील बोटांचा प्रवास आता आकाशवाणीवरील दिग्गज कलावंतांच्या संगतीला थीरकतील.व पुनश्य:एकदा हिंगणघाट नगरीचे नाव व विठ्ठल दानव यांचा तबला आकाशवाणीवर झळकेल त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

ईकबाल पहेलवान साहसिक News-/24 हिंगणघाट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!