आणखी एका शेतकऱ्याने कवटाळले मृत्यूला

0

Byसाहसिक न्युज 24
प्रतिनिधी/मुक्ताईनगर :
कर्जबारीपणाला कंटाळून तालुक्यातील पिंप्रीभोजना येथील एका वयोवृध्द शेतकऱ्याने आपल्या शेतातच मृत्यूला कवटाळल्याची घटना आज पहाटे घडली आहे.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, पिंप्री भोजना येथील परबत रूपा कोळी ( वय ७० ) यांच्यावर कर्ज होते. तसेच त्यांनी काही दिवसांपूर्वी पेरणी केली असली तरी पाऊस न आल्यामुळे ते काही दिवसांपासून प्रचंड नैराश्यात होते. यानंतर आज पहाटे त्यांचा मृतदेह हा शेतात आढळून आला.
शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा परबत कोळी यांचा मृतदेह ह शवविच्छेदन करण्यासाठी रूग्णालयात पाठविण्यात आला होता. तर या संदर्भात मुक्ताईनगर पोलीस स्थानकात नोंद करण्याचे काम सुरू होते. परबत कोळी यांच्या आत्महत्येमुळे परिसरातू हळहळ करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!