आता केवळ अस्वस्थ असलेले बच्चू कडू हे एकटेच बोलत आहे – अनिल देशमुख

0

साहसिक न्युज24
प्रतिनिधी/ वर्धा:
आता केवळ अस्वस्थ असलेले बच्चू कडू हे एकटेच बोलत आहे – अनिल देशमुख

अनिल देशमुख यांच्या विदर्भ दौऱ्याला वर्ध्यातून सुरवात

माजी गृहमंत्री अनिल देशमुख ऑन खातेवातप आणि भाजमधील अस्वस्थ आमदार

– खातेवाटपाच्या बाबतीत जर कोणत्या पक्षात अस्वस्थता आहे तर ती भारतीय जनता पक्षाच्या आमदारामध्ये आहे

– भाजपचे 105 आमदार निवडून आले आणि त्यातले केवळ पाच – सहा मंत्री बनले,भारतीय जनता पार्टीचे आमदार सर्वात जास्त अस्वस्थ आहे, अमच्यासोबत खाजगीमध्ये बोलताना ते कपाळाला हात लावून म्हणतात आमच्या पक्षाचे हे चालू काय आहे सगळे

– आम्ही घरचे आहोत आणि बाहेरचे येऊन सर्व पहिल्या पंगतीमध्ये बसले आहे, असे भाजपचे आमदार बोलत आहेत, भाजपाचेच आमदार भाजपवर नाराज आहे

– त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेले आमदार देखील अस्वस्थ आहे, त्यातल्या अनेक लोकांनी आशा सोडली, त्यांना माहिती आहे की या लोकांनी आपल्याला वापरून घेतले. वर्षभर झालं 40 पैकी उर्वरित आमदारांना मंत्रिमंडळ विस्तार केला नाही, मंत्रिपद कुणालाही मिळाले नाही, त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेले आमदार देखील अस्वस्थ आहे, आता हळूहळू बोलणे सुरू केलं आहे पाहू आता पुढे काय होते ते

– खातेवाटपाबाबत देखील अस्वस्थता आहे, कोणते खाते कोणाला पाहिजे यासाठी धावपळ सुरू आहे, कुणी म्हणते हे खाते या मंत्र्याला देऊ नका अशी सर्व अस्थिर परिस्थिती आहे. या सरकारचा वेळ आमदार संभाळण्यामध्येच जात आहे

– मंत्रिमंडळ विस्तार होऊन बारा दिवस झाले आहे, आतातरी खाते वाटप व्हायला पाहिजे होते

– पुढे 17 तारखेला विधसभेचे अधिवेशन आहे आणि अद्याप खातेवाटप नाही, जनतेचे प्रश्न कायम आहे? अस्वस्थ आमदार पुढे तोंड उघडणार आहे, आता केवळ अस्वस्थ असलेले बच्चू कडू हे एकटेच बोलत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!