आयुष्यमान आरोग्य योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा,आ. रणजित कांबळे.
देवळी ग्रामीण रुग्णालय मध्ये आरोग्य मेळावा
शासनाने आयुष्यमान भारत आरोग्य योजना सामान्य नागरिकांच्या मोफत उपचाराकरिता सुरू केली असून उपचारावर पाच लाखाच्या खर्चाची तरतूद करण्यात आलेली आहे.नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा याकरिता प्रत्येकाने आयुष्यमान कार्ड बनवून घ्यावे असे प्रतिपादन आमदार रणजीत कांबळे यांनी मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.देवळी येथे ग्रामीण रुग्णालयात आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत सामुदायिक आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.त्याचे उद्घाटन आ.रणजीत कांबळे यांच्या हस्ते झाले.मेळाव्यामध्ये विविध आजारांच्या तपासण्या व उपचार करण्याकरिता सेवाग्राम येथील वैद्यकीय रुग्णालयाचे चमू या ठिकाणी आले होते.आरोग्य मेळाव्यात मेडिसिन,सर्जरी, बालरोग,स्त्रीरोग,मानसिक रोग, त्वचा व अस्थिरोग,आधी आजारांच्या पाचशे रुग्णांची तपासणी करण्यात आली. आजारांचे निदान करून काही रुग्णांना पुढील उपचाराकरिता सेवाग्राम व सावंगी रुग्णालयात पाठविण्यात आले.यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.आशिष लांडे यांनी प्रास्ताविकातून सांगितले की आरोग्य मेळावे दर महिन्याला घेण्यात येणार आहे.प्रत्येक नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करून शासकीय योजनेचा लाभ घ्यावा असे सांगितले.यावेळी आमदार रणजीत कांबळे यांनी ग्रामीण रुग्णालयाचा कामाचा आढावा घेतला व दिवसेंदिवस ग्रामीण रुग्णालय मध्ये उपचारा करिता येणारे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सुविधा आवश्यक विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले सध्या येथील ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य सेवा देण्याचे काम चांगले असल्याचे समाधान व्यक्त केले.यावेळी प्रत्येक शिबिरामध्ये विविध आजाराचे आरोग्य तज्ञ यांना बोलावून तपासण्या व उपचार करण्याचे काम या ग्रामीण रुग्णालयातून होणार असल्याचे सांगण्यात आले कार्यक्रमाला आरोग्य सेवा समितीचे सदस्य पवन महाजन,माजी नगराध्यक्ष सुरेश वैद्य,जब्बार तव्वर,माजी नगरसेवक सुनील बासु,यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच कार्यक्रमाला विनय कापसे, अब्दुल रहेमान तव्वर,अजय देशमुख,चंदू वाणी,रमेश काकडे, यांची उपस्थिती होती.आरोग्य तपासण्या डॉ.वंदना वावरे,डॉ. मिलिंद पाटील,डॉ.कार्तिक चौधरी,डॉ.रोशन शेंडे,डॉ. सखाराम,डॉ.मनाली,डॉ.कुणाल टिपले,डॉ.प्रियंका त्रिपाठी,डॉ. पाटील,डॉ.स्वाती,डॉ.मयूर नंनावरे,डॉ.कानिष्क वैष्णोयी,डॉ. सुभोर,डॉ.कोल्हे,डॉ.नीत नवरे, डॉ.हरले यांनी तपासण्या केल्या.
सागर झोरे सहासिक न्यूज -24 देवळी