आर्वी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारे मुख्य आरोपी आर्वी पोलिसांच्या जाळ्यात.

0

घडलेल्या अत्याचार घटनेतील दोन फरार आरोपींना अटक.

आर्वी : तालुक्यातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार १३ ऑक्टोंबर रोजी घडली असून मुख्य आरोपी हा फरार असून हा आता मात्र आर्वी पोलिसांच्या जाळ्यात आहे. यातील फिर्यादी अल्पवयीन पिडीत हि दिनांक १३ ऑक्टोंबर रोजी सकाळी रोहणा येथे कॉलेजला गेली असता तीची प्रकृती खराब झाल्याने बसने रोहणा येथून पारगोठाण येथे येवून बस स्थानकवर उतरून एकटीच पायदळ घराकडे जात असताना अदाजे १० वाजून ४५ वाजताचे सुमारास तिच्या मागुन एक पांढ-या रंगाची स्कॉरपीओ येवुन तीच्या बाजुला थांबली त्यामुळे ती भयभीत होताच गाडीतील एक मुलाने खाली उतरून तिचे तोंड दाबुन तीला गाडीमध्ये मधल्या सिटवर बसविले व आवाज केला तर तुला व तुझ्या आईला मारून टाकीन अशी धमकी दिली. तेव्हा त्याच्या बाजुचा अशपाक रा. धनोडी बहादरपुर याने व त्याचा मित्र शुभम असे दोघांनी तीला धनोडी डॅमकडे नेवुन एका निर्जनस्थळी गाडी थांबवुन दीपानी तिला दारू पाजून जबरदस्तीने आळीपाळीने लैंगिक अत्याचार केले.अशा फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन आर्वी येथे अप. क. १९५६ / २०२३ कलम ३७६ (२), (एन), ३२३, ५०६, ३४ भादवि सहकलम ४, ६ पोक्सो अधिनीयम गुन्हा नीद आहे.सदर घटनेचे गांभिर्य लक्षात घेता मा. पोलीस अधिक्षक नूरुल हसन वर्धा यांचे सुचनेवरून अप्पर पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी पुलगाव पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा व ठाणेदार पोलीस स्टेशन आर्वी यांनी तत्काळ पण भेट देवून परिस्थितीची पाहणी केली. घटणास्थळावरिल परिस्थतीजन्य व तांत्रीक पुरावे गोळा करण्यात आले. मा.पोलीस अधिक्षक, वर्धा यांनी गुन्हयातील फरार आरोपींना तात्काळ अटक करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा व ठाणेदार पोलीस स्टेशन आर्वी यांना मार्गदर्शन करून सुचना दिल्या.स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा व पोलीस स्टेशन आर्वी यांचे पथकाने एकत्रीत कामगिरी करून गोपनीय तसेच तात्रीक माहीतीचे आधारे यातील आरोपीतांचा यवतमाळ, अमरावती, अकोला इत्यादी ठिकाणी प्रत्यक्ष जावून शोध घेतला परंतू सदर आरोपी हे मिळुन आले नाही. सदर आरोपींचा शोध घेत असतांना माहिती मिळाली की, गुन्हयातील दोन्ही आरोपी है त्यांच्याकडील असलेली स्कॉरपोओ या चारचाकी वाहणाने पुणे येथे पसार झाले आहेत. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा व आर्वी पोलीस स्टेशन पथकाने पुणे येथे रवाना होवून त्यांचा शोध घेतला. त्यादरम्याण खात्रीशीर माहिती मिळाली की, दोन्ही आरोपी हे कंपनीमध्ये काम करण्यासाठी पुणे जिल्हयातील राजनगांव परीसरात गेले आहेत. राजनगांव परीसरात जावून त्याचा शोध घेतला असता दोन्ही आरोपी हे त्यांच्याकडील महिंद्रा स्कॉरपीओ या चारचाकी वाहणाने मौजा कारेगांव येथे मिळून आले. आरोपी १) शुभम उर्फ प्रयोग प्रकाशराव पानबुडे, व २९ वर्ष २) अशपाक अकबर शहा, वय २० वर्ष दोन्ही रा. धोडी बहादरपुर, ता. आय जिल्हा वर्धा यांना वास्यात घेवून सखोल विचारपुस केली असता त्यांनी गुन्हयाची कबूली दिली. दोन्ही आरोपीतांना ताब्यात घेवून पोलीस स्टेशन आर्वी येथे परत येवून सदर आरोपीतांना अटक करून मा. न्यायालयात पेश केले असता मा. न्यायालयाने आरोपीना दिनांक २०.१०.२०२३ पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केला आहे.सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक नूरुल हसन, मा. अपर पोलीस अधिक्षक सागर कवड़े मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, आर्वी.खडेराव, पोलीस निरीक्षक, स्थागुशा संजय गायकवाड, ठाणेदार पोलीस स्टेशन आव प्रशांत काळे, सपोनि धनश्री कुटेमाडे प्रभारी पोक्सो सेल, उपविभाग आय याच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक राम खोत, पोलीस अंमलदार मनोज भात्रक, संतोष दरगुडे, राजेश दिवस्कर, अक्षय राउत, विशाल मडावी सर्व स्थानिक गुन्हे शाखा, तसेच पोलीस स्टेशन आर्वी येथिल पो. अमलदार रामकिसन कास्देकर, निलेश करडे, राहूल देशमुख चालक शिवकुमार परदेशी यांनी केली. सदर कारवाइमध्ये पोलीस स्टेशन राजनगाव एम.आय.डी.सी. पुणे ग्रामिण येथील अमलदार यानी मदत केली.  हाच तो अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा मुख्य आरोपी शुभम पाणबुडे आर्वी पोलिसांच्या जाळ्यात

 

अविनाश नागदेवे सहासिक न्यूज-24 वर्धा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!