आषाढी एकादशी निमित्त घोराडमधील दुमदुमली प्रतीपंढरी; घोराड येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी

0

By साहसिक न्युज 24प्रतिनिधी/ सेलू: तालुक्यांतील विदर्भाची प्रतीपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र घोराड येथे आषाढी एकादशी निमित्त भाविकांची मोठी गर्दी उसळली आषाढी एकादशी निमित्त हरीनामाचा जयघोष करीत मंदिरातून निघालेली दिंडी आणि भाविकांचा उत्साह पाहता प्रतीपंढरी दुमदुमली होती दोन वर्षे कोरोनामुळे बंद असलेली आषाढी वारी आणि मंदीरही बंद असल्याने भाविकांनी पायरीवर नतमस्तक होत विठ्ठलाचे दर्शन घेतले होते यावर्षीला प्रथमच आषाढी वारीचा आनंद घेत वारकरी पंढरीत दाखल झाले त्यामुळे भाविकांचा ओघ येथे दिवसभर सुरूच होता यावर्षी भाविकांच्या गर्दीने मंदिर परीसर फुलून गेला होता तसेच दुपारी एक वाजता परंपरेनुसार मंदीरातून दिंडी निघाली हरीनामाचा गजर करीत दिंडी संपूर्ण गावाला प्रदशिणा घालीत मंदिर परिसरात आली शेतशिवारातून फिरत गावाला प्रदक्षिणा घालण्याची ही दिंडी ची गेल्या अनेक वर्षांपासून ची परंपरा आजही कायम आहे दिंडी मंदिरात आल्यानंतर भाविकांना प्रसाद वितरणाने या सोहळ्याची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!