आषाढी वारीची लगबग लागली वारकऱ्यांना
साहसिक न्युज 24
प्रतिनिधी/ मुक्ताईनगर:
आषाढी वारी निमित्त मुक्ताईनगर येथील महाराष्ट्रातील सर्वात महत्वाची मानल्या जाणारी आदिशक्ती मुक्ताबाई ची पालखी 3 जूनला आषाढी वारी निमित्त पंढरपूरकडे निघणार आहे संस्थानच्यावतीने जय्यत तयारी सोहळ्यानिमित्त सुरू झाली आहे पालखीची रंगरंगोटी व वारकरी पोशाख विविध कामे सुरू झाले आहे
तब्बल दोन वर्षाच्या कोरोनाच्या कालखंडानंतर मुक्ताई पालखीचा रथ पंढरपूरला निघणार आहे
दोन वर्षापासून रथ जागेवरच थांबलेला होता मात्र यावर्षी पैदल वारी सोहळा असल्याने मुक्ताबाई संस्थांच्या वतीने रथाची व पालखीची रंगरंगोटी या ठिकाणी जय्यत तयारी सुरू झाली आहे वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण दिसून येत आहे………..