आष्टी गावचे धनंजय सायरे यांची देशातील सर्वोत्कृष्ट “एस पी जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च -मुंबई” येथे निवड….

0

 आष्टी शहीद -/ आंतरराष्ट्रीय रँकिंग ‘फायनान्शियल टाईम्स’ हे भारतातील बिझिनेस स्कुलचे रँकिंग ठरवते. 21 व्या शतकातील जागतिक व्यवस्थापक ज्या देशभरातील इन्स्टिट्यूट मध्ये घडवले जातात त्या यादीत भारतातील क्रमांक एकचे बिझिनेस स्कुल म्हणून मुंबई चे “एस पी जैन इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट अँड रिसर्च” (SPJIMR-Mumbai) हे ओळखले जाते. एमबीए इन्स्टिट्यूट चे रँकिंग करणारे ‘बिझनेस टुडे’ कडून देशातील पहिल्या पाच मध्ये तसेच जगभरातील पॉझिटिव्ह इम्पॅक्ट रेटिंग मध्ये ‘सामाजिक बदल व शाश्वतता’ या विषयाचे जगातील पाच महत्त्वाच्या बिझनेस स्कुल यादी मध्ये SPJIMR ची गणना केली जाते.. अशा बिझिनेस स्कुल मध्ये आष्टी येथील मूळ रहिवासी धनंजय गोविंदराव सायरे यांची निवड होणे ही अभिमानाची गोष्ट आहे. धनंजय सायरे हे आष्टी येथील लोकमान्य विद्यालय येथे 10 पर्यंत तसेच हुतात्मा राष्ट्रीय विद्यालय येथे 12 वी चे शिक्षण घेतले.. बि.एस्सी ला पर्यावरण शास्त्र व पुढे एम एस्सी ला ‘जैवविविधता संवर्धन’ विषय घेऊन पुणे विद्यापीठात शिक्षण घेतले.. केंद्रीय पर्यावरण मंत्रालय समर्पित सेंटर फॉर एन्व्हर्नमेंट एज्युकेशन- पुणे येथे पर्यावरण शिक्षण अधिकारी म्हणून 3 वर्ष नोकरी केली. परंतु जमिनी स्तरावर लोकांसोबत काम करण्याची ईच्छा व जंगल वन्यजीव अभ्यासाची आवड असल्याने पुणे येथील नोकरी चा राजीनामा देऊन थेट मेळघाट गाठले. प्रसिद्ध अभिनेता अमीर खान यांनी स्थापन केलेल्या पानी फौंडेशन चे काम मेळघाट चे जिल्हा समनव्यक म्हणून सुरू केले. सलग 4 वर्ष मेळघाटात काम करून याही नोकरी ला रामराम ठोकला. आज व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात असलेल्या माखला या गावात स्थायिक होऊन राहून नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन व व्यवस्थापन त्यातून रोजगार निर्मिती, अशा उद्देशाने मेळघाटातील आदिवासी सोबत गेल्या 3 वर्षांपासून काम करत आहेत. हे काम करतांना त्यांनी अगदी साधेपणाने अंतरजातीय मेळघाटातीलच मुलीशी लग्न केले. माखला हे गाव स्वातंत्र्याच्या 75 वर्षा नंतर मूलभूत सुविधा पासून वंचित आहे. गावात अजूनही वीज नसल्याने सौर ऊर्जेची वीज आहे, योग्य रित्या पानी रस्ता, इंटरनेट या निरंतर सुविधा नाहीत. आशा गावात राहून आज मेळघाटातील अशाच माखला सारख्या 40 गावासोबत आज धनंजय आणि त्यांची धर्मपत्नी गिता काम करत आहेत. यासाठी निसर्गा फौंडेशन या संस्थेची स्थापना केली. याच सामाजिक कामाची दखल घेऊन एस. पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चने पूर्ण शैक्षणिक प्रवेश शुल्क शिष्यवृत्ती सह निवड केली आहे.. “सामाजिक विकास व्यवस्थापन” सारख्या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेऊन मेळघाट सारख्या दुर्गम भागात आयुष्यभर मेळघाट च्या शाश्वत ग्राम विकासासाठी काम करण्याचा त्यांचा निर्धार आहे. *त्यांच्या सामाजिक कामाची दखल बेटर इंडियाने इंडियाज कोव्हिडं सोल्जर, युनिसेफ-मुंबई तर्फे ‘युथ फॉर क्लायमेट ऍक्शन’ महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ तर्फे ‘जैवविविधता संवर्धक’ रोटरी इंटरनॅशनल क्लब पुणे तर्फे ‘ग्रिन एम्बेसेडर’ अशा विविध पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

नरेश भार्गव साहसिक news -/24 आष्टी शहीद 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!