आष्टी तालुक्यातील ४ लघू प्रकल्प १०० टक्के भरले ;सतर्कतेचा ईशारा

0

Byसाहसिक न्यूज24
प्रतिनिधी / वर्धा:
आष्टी तालुक्यातील ४ लघू प्रकल्प आज सकाळी ८ वाजता १०० टक्के क्षमतेने भरले आहे. त्यात आष्टी लघू प्रकल्प, पिलापूर लघू प्रकल्प, परसोडी लघू प्रकल्प व मलकापूर लघू प्रकल्पाचा समावेश आहे. प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरल्याने प्रकल्पातील पाणी नदी पात्रात सोडले जात आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!