आष्टी शहीद -/आष्टी पोलीस स्टेशनचे ठाणेदार बबन पुसाटे की सुनील पवार यापैकी कोण? हा प्रश्न दाखल होत असलेल्या प्रथम खबर अहवालावरून उत्पन्न झालेला आहे कागदोपत्री ठाणेदार बाबत संभ्रम निर्माण दिसून येत आहे
आष्टी पोलीस स्टेशन चा कारभार बेशिस्त व दुर्लक्षित असल्याचे दिसून येते एक जानेवारीपासून आष्टी पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालेल्या तक्रारी आज पर्यंत ऑनलाईन पद्धतीने दिसत नसून एफ आय आर पाहण्याकरिता किंवा माहिती घेण्याकरिता आरोपींना किंवा वकिलांना पोलीस स्टेशनचे फेऱ्या मारा लागत आहे.24/12/24 FIR न.405/24कलम 303(2) मध्ये छापील संगणीकृत एफ आय आर वर ठाणेदार प्रभारी अधिकारी म्हणून सुनील चंद्रासिंग पवार असे नाव दर्शविलेले आहे परंतु सुनील पवार यांची बदली मागील तीन महिने अगोदरच झालेली आहे मग आता यावर पवार यांचे नाव असणे हे कायदेशीर रित्या चुकीचे आहे त्याचप्रमाणे पोलीस स्टेशनचे संगनिकृत प्रथम खबर अहवाल फिर्यादींना मिळत नसून संगणकृत मशीन खराब असल्याचे सांगण्यात येते यावर वरिष्ठाने लक्ष देणे गरजेचे आहे.