इंटरनेशनल बुक ऑफ रेकॅार्ड व ऑफिसियल वर्ल्ड रिकॉर्ड मानांकन प्राप्त यश

0

By सहसिक न्यूज 24
प्रतीनिधी /वर्धा :
वर्धा जिल्ह्यातील वायगाव या गावातील सर्वसाधारण कुटुंबातील आणि अवघ्या नवव्या वर्गात शिकणाऱ्या यश गौरव देशमुख या विद्यार्थ्याने यंगेस्ट इग्ननाइट स्पिकर, म्हणून जगात इंटरनेशनल बुक ऑफ रेकॅार्ड व ऑफिसियल वर्ल्ड रिकॉर्ड मानांकन प्राप्त केले आहे.नागपूर विभागीय आयुक्त डॉ.माधवी खोड़े(चवरे) यांनी आज यशचे कौतूक केले.विदर्भातील विद्यार्थी राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकले पाहिजे, असे यशचा गौरव करतांना त्यांनी सांगितले.
यश देशमुख वर्धा महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालयातील केंद्रीय विद्यालयाचा वर्ग नववीपरीक्षा देऊन दहावी मधे विद्यार्थी आहे. तो वयाच्या बारा वर्षांपासून मोटिव्हेशनल स्पिचमध्ये पारंगत आहे. वेगवेगळ्या विषयावर सातत्याने प्रेरणात्मक व्याख्याने देत असतो. त्यामुळे त्याला सातत्याने व्याख्यानांसाठी वेगवेगळ्या स्तरावरून निमंत्रित केले जात असते. इंडियाज वर्ल्ड रेकॅार्ड 3 महिन्यापूर्वी नामंकन मिळवल्या नंतर आता इंटरनेशनल बुक ऑफ रेकॅार्ड व ऑफिसियल वर्ल्ड रिकॉर्ड
या संस्थेच्यावतीने दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रतिभावान व्यक्तींना जगाच्यापातळीवर मानांकीत केले जाते.
यशला शालेय विद्यार्थी या गटातून यंगेस्ट इंस्पिरेशनल स्पिकर व यंगेष्ट इग्ननाइट स्पिकर म्हणून देशपातळीवर इंटरनेशनल बुक ऑफ रेकॅार्ड व ऑफिसियल वर्ल्ड रिकॉर्ड मानांकन प्राप्त झाले आहे. तो आता ग्रेनिस बुक ऑफ रेकॅार्डची तयारी करत असून यामध्ये सुध्दा मानांकन मिळेल, असे तो आत्मविश्वासाने सांगतो. यशने आपले वडील महेंद्र देशमुख व आई मनिषा देशमुख मोठे बाबा प्रमोद देशमुख यांच्यासह विभागीय आयुक्त नागपुर भा.प्र.से. डॉ. माधवी खोड़े(चवरे) यांची भेट घेतली. डॉ. माधवी खोड़े(चवरे) यांनी त्याचे कौतूक केले. विदर्भातील मुले राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकले पाहिजे. खुप मोठा हो आणि देशाचे नाव मोठे करं, अशा शुभेच्छा देखिल विभागीय आयुक्त नागपुर यांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!