एन डी पी एस गुन्ह्यातील नऊ महिन्या पासून फरार असलेला आरोपी स्थानिक गुन्हे शाखा,वर्धा यांच्या जाळ्यात

0

    ३१ जानेवारी रोजी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन समुद्रपूर येथे आरोपी 1) पूजा मोहिते रा. सेवाग्राम 2) हेमा हमद रा.जाम 3) आकाश मोहिते (फरार) रा. शिवनगर ता. सेलू ,वर्धा यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन समुद्रपूर अप क्रमांक. 82/23 कलम 20(ब) 29 NDPS अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील आरोपी त्यांना १० किलो गांजा अमली पदार्थसह ताब्यात घेताना मोटर सायकल चालक आरोपी आकाश मोहिते यास पोलिस आल्याची चाहूल लागताच तो अंधाराचा फायदा घेऊन शेत शिवारामध्ये पसार झाला होता त्याचा वारंवार शोध घेणे सुरू होते परंतु तो मिळून येत नव्हता.
‌आज दिनांक २३ सप्टेंबर रोजी सदर आरोपीच्या शोध संबंधाने पेट्रोलिंग करीत असताना मुखबीर द्वारे माहिती प्राप्त झाली की सदर आरोपी हा आपले घरी स्वतःचे आईला व पत्नीला भेटण्याकरिता शिवनगर येथे येणार आहे.त्यामुळे त्याचे शिवनगर येथील राहते घराजवळ सापळा रचला असता यातील आरोपी नामे आकाश रोहिदास मोहिते वय २३ वर्ष रा शिवनगर ता सेलू जिल्हा वर्धा हा येताच त्याच सिताफिने ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही येताच त्यास सिताफिने ताब्यात घेऊन पुढील कारवाई करता पो स्टे समुद्रपूर यांचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक नूरुल हसन,अप्पर पोलीस अधिक्षक डाॅ. सागर रतनकुमार कवडे,यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, यांचे निर्देशाप्रमाणे पोउपनी राम खोत, पोलीस अमलदार सचिन इंगोले, प्रमोद पिसे,रामकिसन ईप्पर,नितीन ईटकरे,पवन पन्नासे सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा,वर्धा यांनी केली. 

      अविनाश नागदेवे सहासिक न्यूज-24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!