ऑनलाईनच्या कामाचे दुकान चालविणारा पंकज लभाने नामक दुकानदार करतो नागरिकांची फसवणूक: २६ रुपयांची पावती देऊन उकळले चक्क १५० रुपये

0

साहासिक वृत्त:

राज्यात तसेच जिल्ह्यात सर्वच कामे ऑनलाईन च्या माध्यमातून डिजिटल इंडियाच्या नावाखाली करण्याची सुविधा शासनामार्फत राबविण्यात येत असल्यामुळे स्थानिक ऑनलाईन सेंटरचे “रेट” आसमानात पोहचल्याचे चित्र सर्वत्र दिसून येते.

यातलाच एक प्रकार, वर्ध्यामध्ये जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अगदी समोर असलेले पंकज लभाने यांचे ऑनलाईन चे दुकान स्थित असून या दुकानदारचा नागरिकांना लुबाडण्याचा धंदा “बे-लगाम” सुरू आहे, ज्यावर कुणाचेही नियंत्रण नाही. एकंदरीत बघायचे असता जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच गावं-खेड्यातील लोकांना जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, भूमी-अभिलेख व इतर सर्व शासकीय आस्थापनांमध्ये सर्वच कामे ऑनलाईन पद्धतीने होत असल्याने ऑनलाइन सेंटरवर जावून अर्ज करावा लागतो त्यापासून नागरिकांची नियमित फसवणूक होणे हे नियमितच आहे, यालाच आळा घालन्यासाठी व नागरिकांची फसवणूक कमी करण्यासाठी व त्यातही महत्वाचे म्हणजे आर्थिक भ्रष्टाचार कमी करण्याच्या उद्देशाने शासनाने ऑनलाईन व्यवस्थेवर सर्वाधिक भर दिलेला आहे. परंतु, ऑनलाईनच्या माध्यमातून लूटमार करणार्‍यांवर नियंत्रण ठेवत  त्यांच्यावर आळा घालणारे विशेष पथकसुद्धा तयार करण्याची ऐपत जिल्ह्याच्या शासनात नाहीत ही विशेष चर्चेची बाब ठरत आहे.

ऑनलाईनच्या माध्यमातून होणारी लूट थांबवावी व केवळ वैध परवानाधारक दुकानदारांनाचं ऑनलाईनची कामे करण्याची जिल्ह्यात परवानगी द्यावी जेणे करून ऑनलाईनच्या कामावरील नियंत्रण राखून राहील. परणामी जिल्ह्यात गोर-गरीब जनतेची ऑनलाईनच्या नावाखाली फसवणूक होणार नाही.

असाच एक प्रकार वर्धा जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अगदी समोर असलेले पंकज लभाने यांचे ऑनलाईन सेंटरमध्ये घडलेला आहे यातील विष्णु शिवकार नामक व्यथित व्यक्ति हा सबाने यांच्या दुकानात ऑनलाईनच्या माध्यमातून एक चालान भरण्याकरिता गेला असता त्याचेकडून सदर दुकानदार यांनी चक्क “१५० रुपये उकळले, पण पावती मात्र २६ रुपयांचीच दिली”. असा गैर-प्रकार वरील पंकज लभाने यांच्या दुकानात नेहमीच होत असल्याचे दिसते. पंकज लभाने यांची ऑनलाइन पद्धतीने चालान भरण्याची वाजवी “फी” १५० रुपये आहेत जी एका संवेदनशील वैद्यकीय तपासणी करणार्‍या डॉक्टरांच्या फी पेक्षाही अधिक असून गोर-गरीबांना न-सोसणारी आहेत. ह्या सगळा भ्रष्ट गतीविधीला जिल्ह्याचे जबाबदार प्राधिकरण ह्या नात्याने केवळ जिल्हाधिकारीचं जबाबदार आहेत. म्हणून जिल्हाधिकारी यांनी अश्या लूटमारीच्या प्रकरणांत जातीने लक्ष देवून ऑनलाइन सेंटर चालविणार्‍यांवर नियंत्रण ठेवण्याकरिता एक विशेष पथक तयार करून नागरिकांची फसवणूक करणार्‍या दुकानदारांवर कठोर कार्यवाही करावी व ज्यांचेकडे वैध CSC सेंटर, महाऑनलाईन सेंटर आपले सरकार आहेत त्यांच्यावर सुद्धा नियंत्रण ठेवत त्यांचे वाजवी रेट निश्चित करून ऑनलाइनशी संबंधित कामे करण्याची परवानगी द्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!