ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटर शेन वार्न यांना पालकमंत्री सुनील केदार यांनी वाहिली श्रद्धांजली
प्रतिनिधी / वर्धा:
क्रिकेट विश्वाचे महान खेळाडू, जगविख्यात लेगस्पिनर गोलंदाज ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे माजी कर्णधार शेन वॉर्न यांच्या निधनाने क्रिकेट विश्वाची मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे. शेन वॉर्न यांच्या निधनाने फिरकी गोलंदाजी विश्वातील न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. आपल्या शैलीदार फिरकी गोलंदाजीने शेनवॉर्न यांनी जगभरातील क्रिकेट रसिकांना खिळवून ठेवले आहे.त्यामुळे केवळ आस्ट्रेलियाच नव्हे तर भारतासह जगभरात त्यांचे चाहते आहे. संपूर्ण क्रीडा विश्वासाठी हा दुःखद प्रसंग आहे.भल्या भल्या फलंदाजांना नाचविणाऱ्या महान फिरकीपटू शेन वॉर्न यांना भावपूर्ण श्रद्धांजली
पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास ,क्रीडा व युवक कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य.सुनील केदार, यांनी वाहिली .