कत्तलखान्यात जाणाऱ्या जनावरांना पोलिसांनी दिले जीवदान
साहसिक न्युज 24/
देवळी : सागर झोरे
देवळी शहरात रात्रीच्या वेळी पेट्रोलिन दरम्यान जनावरांचा ट्रक कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या ट्रक देवळी पोलिसांनी पकडला आहे.
सविस्तर वुत्त असे की देवळी शहरापासून वायगाव रोडवरील असलेल्या दत्त मंगल कार्यालय जवळ मालवाहू गाडी क्रमांक एम एच 30 बी डी 4232 या गाडीच्या डाल्यामध्ये जनावारांना निर्दयतेने कोंबून त्यांना इजा, दुखापत होईल अशा पद्धतीने भरून कत्तलिसाठी घेऊन जात असताना देवळी पोलीस स्टेशन चे पीएसआय सुमित कांबळे यांनी रात्र पेट्रोलिन करत असताना ही कारवाई करण्यात आली आहे. सदर मालवाहू गाडीची पाहणी केली असता गाडीच्या डाल्यामध्ये पाच कालवड,पाच गाई,तर एक बैल ,एक गोरा,किंमत अंदाजे 80 हजार पाचशे रुपये व गाडी किंमत 2 लाख 50 हजार रुपये असा एकूण 3 लाख 30 हजार 500 चा माल मिळून आला आहे. यामध्ये एका आरोपीस अटक करण्यात आली असून तर दुसरा आरोपी घटनास्थळावरून अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला आहे.तसेच आरोपी मोहम्मद राजीक मोहम्मद साजीक राहणार मूर्तिजापुर जिल्हा अकोला,तसेच आरोपी जाकिर अहमद अपसर अहमद राहणार मूर्तिजापुर जिल्हा अकोला, या दोघांवरती महाराष्ट्र प्राणी संरक्षण(सुधारणा) अधीनियम 1995 नुसार कलम 5 अ, 5 ब,11(1)(d) आरोपीविरुद्ध गुन्हादाखल करून पुढील तपास देवळी पोलिस स्टेशनचे पीएसआय सुमित कांबळे करीत आहे