कार पुलावरुन कोसळली ६ महिन्यांच्या बालकासह ६ गंभीर जखमी

0

हिंगणघाट पोलिसांनी मोहाता मिल चोरीचा छडा; तीन चोरट्यांना केले अटकBy साहसिक न्युज 24
प्रतिनिधी /वर्धा :
सावळापूर समोरील पिंझारा शिवारात रात्री 1 च्या सुमारास कार पुलाच्या खाली कोसळल्यामुळे झालेल्या अपघातात ६ महीन्याच्या बालकासह ६ जण गंभीर जखमी झाले आहेय.सविस्तर वुत्त असे की चंद्रपूर येथून आर्वी मार्गे मोझरीला वाढोना घाटातून आर्वीकडे येत असताना सावळापूर नजीक असलेल्या पुलावरून कार खाली कोसळली. यात कारमधील विवेक बुटले (60), रिया विवेक बुटले (25), सुनील हरिदास राळे (47), परमेश्वरी सुनिल राळे (42), आर्य सुनील राळे (6 महीने), सुनीता विवेक बुटले (50) जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच तात्काळ गणेश राठी, ऋषभ निस्ताने, विशाल साबळे, मयूर शिरभाते, गौरव जाजू, यश सरायकर व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी पोहोचून कारमध्ये अडकलेल्या जखमींना गाडीच्या बाहेर काढून तात्काळ रुग्णवाहिका बोलावून आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचाराकरिता सावंगी मेघे येथे पाठविण्यात आले. पोलिस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांचा मार्गदर्शनात जमादार पाल, जाधव, आकाश चोरपगार पुढील तपास करीत करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!