कुत्र्यांच्या तावडीतुन वाचवून प्राणीमित्र सचिन कांबळे यांनी दिले रोहिच्या पिलाला जीवनदान
सहसिक न्यूज 24
देवळी प्रतिनिधी / सागर झोरे :
देवळी तालुक्यातील पुलगाव येथील लागून असलेल्या मिल्ट्री कॅम्प च्या बाजूला असलेले प्रिया लेआउट मधील एक रोही च्या पिल्याला कुत्र्यांच्या तावडीतून सचिन कांबळे यांनी जीवनदान दिले . सविस्तर माहिती अशी की प्रिया ले आऊट मधील रोही च्या पिल्लाला आठ ते दहा कुत्रे चावा घेऊन त्याला जखमी करत होते त्याचवेळी सचिन कांबळे नि त्या रोही च्या पिल्याला कुत्र्याच्या तावडीतून सुटका केली व रोहिच्या पिल्याला उपचार करून वनविभाग यांच्याशी संपर्क साधून त्यांना घटनास्थळी बोलविले व यांच्याकडे सोपविण्यात आले तसेच वन विभागाचे शिवाजी राठोड यांनी घटनास्थळी येऊन रोही च्या पिल्ल्याची तपासणी करून वनविभाग बीएससी वर्धा येथे हलविण्यात आले.त्यावेळी सचिन कांबळे,विनोद कांबळे,सुरेश कांबळे,दीपक कांबळे,यांनी रोहिच्या पिल्याला कुत्र्याच्या तावडीतून सुटका करून रोहीच्या पिल्याला जीवनदान दिले.