केंद्रीय राज्यमंत्री भानू प्रताप सिंग वर्मा जिल्ह्याच्या दौऱ्यावर
साहसिक न्युज24
प्रतिनिधी/वर्धा:
केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री भानु प्रताप सिंग वर्मा उद्या दि.1 ऑक्टोंबर रोजी वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम असा आहे.दि.1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता नागपूर विमानतळ येथून वर्धा कडे प्रयाण करतील. सायंकाळी 6.45 वाजता शासकीय विश्रामगृह वर्धा येथे आगमन व मुक्काम. दि.2 ऑक्टोंबर रोजी सकाळी 8 वाजता विश्रामगृह वर्धा येथून महात्मा गांधी आश्रम, सेवाग्रामकडे प्रयाण करतील. सकाळी 8.15 वाजता सेवाग्राम आश्रम बापुकुटी येथे आगमन व भेट. सकाळी 8.50 वाजता सेवाग्राम आश्रम येथून महात्मा गांधी इन्स्टीटयूट फॉर इंन्डस्ट्रीलायझेशन (एमगीरी) कडे प्रयाण करतील. सकाळी 9.15 वाजता येथे आयोजित महात्मा गांधी इन्स्टीटयूट फॉर इंन्डस्ट्रीलायझेशन (एमगीरी) सेवाग्राम महोत्सव कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2 वाजता एमगीरी येथून विश्रामगृहाकडे प्रयाण करतील. सायंकाळी वर्धा येथून नागपूर कडे प्रयाण करतील.