कै.दिनकरराव गित्ते यांच्या १६ व्या पुण्यतिथी निमित्ताने आदर्श शिक्षक, शिक्षणप्रेमी पालक व गुणवंत विध्यार्थी पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

0

साहसिक न्युज24
प्रतिनिधी/ परळी वैजनाथ :
सर्वांगीण शिक्षणासाठी शिक्षक, पालक आणि विद्यार्थी या सर्वांचे योगदान महत्त्वाचे आहे. प्रत्येकाचे कार्य आणि दायित्व अमूल्य आहे. या अनुषंगाने विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटी, परळी द्वारे आपल्या परिसरातील आदर्श शिक्षक, शिक्षणप्रेमी पालक आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा पुरस्कार देवून गौरवविण्यात येणार असून या क्षेत्रात काम करण्यार्‍या नागरीकांनी आपला प्रस्ताव 30 सप्टेंबर पर्यंत पाठवावेत असे आवाहन विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा उषा किरण गित्ते यांनी केले आहे.सध्याच्या युगांत ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान कौश्यल्याचे प्रभुत्व आहे. २१ व्य शतकातील आव्हाने पेलून आपले जीवन आनंदी आणि समाज देश समृद्ध करण्यासाठी शिक्षणाला अभूतपूर्व असे महत्व प्राप्त झाले आहे. शालेय शिक्षण हे विद्यार्थ्यांची जडणघडण, व्यक्तिमत्व विकास आणि मानवी मूल्यांची जोपासना करण्यासाठीची पायाभरणी आहे. परळी परिसरातील सर्व शाळा, महाविद्यालय या क्षेत्रात भरीव कामगिरी करत आहेत.
कै दिनकरराव गित्ते यांच्या १६ व्या पुण्यतिथी निमित्ताने सत्कार सोहळ्याचे आयोजन रविवार दि ९ आक्टोबर २०२२ रोजी करण्यात येणार आहे. करीता सर्व शाळा महाविद्यालयांनी परिसरातील खालील व्यक्तींचे नामांकन पाठवावे हि विनंती.
३ शिक्षक (प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक प्रत्येकी एक ) ज्यांनी नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धती अवलंबून विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांची जोपासना व विकास केला.
३ पालक ज्यांनी अतिशय कठीण परिस्थितीमध्ये आपल्या पाल्यासाठी, शाळेसाठी किंवा परिसरात शिक्षणाचे आवाड निर्माण व्हावी यासाठी मेहनत घेतली.
३ विधार्थी ज्यांनी शालेय जीवनात आपल्या बुद्धिमतेची, कला, संगीत, क्रीडा गुणांची चुणूक दाखवली आणि अनन्यसाधारण यश प्राप्त केले.

वरील नामांकन सचिव, विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटी, किरण गित्ते आय ए एस अकॅडमी, प्रिया नगर, परळी पाठवावेत. (संपर्क बालाजी दहिफळे ९९७५९३२७३६)

शिक्षण क्षेत्रातील तज्ञ, शैक्षणिक अधिकारी, वरिष्ठ नागरिक यांच्या समिती द्वारे नामांकन प्राप्त व्यक्तीमधून सत्कारासाठी अंतिम निवड करण्यात येईल.

यांसदर्भात किरण गित्ते आय ए एस अकॅडमी येथे नुकतीच कार्यक्रमाची रूपरेषा संदर्भात व आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी प्राचार्य डॉक्टर मेश्राम सर यांच्या अध्यक्षतेखाली व मान्यवर शिक्षकांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये गुणवंत विद्यार्थी व शिक्षणप्रमी पालक निवड समिती व आदर्श शिक्षक निवड समिती या दोन समित्यांची नियुक्ती निवड करण्यात आली आहे.
तरी परिसरातील आदर्श शिक्षक, शिक्षणप्रेमी पालक आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा पुरस्कार देवून गौरवविण्यात येणार असून या क्षेत्रात काम करण्यार्‍या नागरीकांनी व शाळा महाविद्यालयांनी आपला प्रस्ताव 30 सप्टेंबर पर्यंत सचिव, विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटी, किरण गित्ते आय ए एस अकॅडमी, प्रिया नगर, परळी येथे पाठवावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!