कोथळी येथे 15 वित्त आयोग अंतर्गत होणाऱ्या विकास कामाचे भूमिपूजन

पंकज तायडे/मुक्ताईनगर
तालुक्यातील कोथळी गावातील रहिवासी माजी सैनिक धोंडु शिंदे यांच्या हस्ते कोथळी येथे 15 वा वित्त आयोग अंतर्गत होणाऱ्या विकास कामाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळेस कोथळी गावचे सरपंच नारायण चौधरी ,उपसरपंच पंकज राणे, तसेच ग्रामपंचायत सदस्य योगेश राणे ‘ ग्रा.पं.स. मोहन कोळी , बाळा विटकरे, ग्रामसेवक चौधरी अप्पा व इतर ग्रामस्थ हजर होते.