खरांगण्याचे ठानेदार संतोष शेगावकर व देवळी ठाण्याचे पो. नायक विनोद कांबळे यांची राष्ट्रपती पुरस्कारासाठी निवड
देवळी / सागर झोरे :
सद्ररक्षणाय खलनिग्रहणाय या वाकयाप्रामाणे वर्धा जिल्ह्यातील पोलिस विभागातील अधिकारी व कर्मच्याऱ्यांनी उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे त्यांना राष्ट्रपती शौर्य पदकाणे सन्मान्नीत करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. यामध्ये वर्धा जिल्ह्यातील खरांगणा पोलिस येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष शेगावकर, तसेच पोलिस निरीक्षक महेश मुंडे व देवळी पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेले नायक पोलिस शिपाई विनोद कांबळे यांची राष्ट्रपतीचे पोलिस शौर्यपदक याकरिता निवड करण्यात आली आहे. यांची राष्ट्रपती पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल खरांगणा व देवळी पोलिस कर्मच्याऱ्यांच्या वतीने शुभेच्छ्या दिल्या आहे.