कारंजा/ प्रतिनिधी:

कारंजा तालुक्यातील मौजा खरसखांडा येथील येथील शेतकरी आत्माराम शेंदरे यांनी तीन एकर शेतात त्यांनी गहू पीक पेरले होते. त्यांच्या जाणाऱ्या 11 kv हाय व्होल्टेज विद्युत तारांचा शॉर्ट सर्किट झाल्याने गव्हाच्या पिकाला आग लागली .शेता लगत लागून असलेल्या काही लोकांना गहू जळतांना दिसताच त्यांनी आरडाओरडा केला व आग विझविली पण त्यात अंदाजे 60 टक्के गहू जळून खाक झाला त्यात अंदाजे 20 ते 25 क्विंटल गहू जळाला असून अंदाजे साठ हजार रुपयांची नुकसान झालेले आहे. शासनाने सदर प्रभावित पिकाचे पंचनामा करून आपत्ती व्यवस्थापन विभागांतर्गत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!