गटविकास अधिकाऱ्यांच्या मध्यस्तीने उपोषण सुटले…

0

शेतकऱ्याला मिळणार एम.आर.ई जी.एस. मधून सिंचन विहिरीचा लाभ.

आष्टी शहीद : तालुक्यातील धाडी येथील शेतकऱ्याला डॉ .बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वालंबी सिंचन विहीर योजनेतून ऑनलाइन अर्ज केला होता.त्यामध्ये शेतकऱ्याची विहीर मंजूर होऊन सुद्धा या समितीच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बेताल कारभारामुळे विहीर मंजूर असतानाही पंचायत समिती समोर याला भारताला दिनांक २४ जानेवारी ला आमरण उपोषणाला बसावे लागले. सिंचन विहिरीचा गुंता सुटत नसल्याने यामध्ये आष्टी पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी हस्तक्षेप करून लाभार्थ्याला न्याय देऊन वीर मंजूर करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण कर्त्याने उपोषण मागे घेतले.
सविस्तर वृत्त असे की धाडी येथील धनराज गजरे या शेतकऱ्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वालंबी सिंचन विहीर योजनेत अंतर्गत विहिरी करिता ऑनलाइन अर्ज केला होता यामध्ये त्या शेतकऱ्याची विहीर मंजूर होऊन आली होती. त्यानंतर धनराज गजरे हे आष्टी पंचायत समिती कृषी विभाग येथे गेले असता त्यांना कृपया सांगून आपल्याला वीर करता येत नाही असे सांगत हुडकावून लावले. कृपया दूर करून आता तरी विहीर खोदकामास सुरुवात होईल याकरिता धनराज गजरे हे पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी यांना भेटले व त्यांनी सांगितले की उद्या तुमच्या शेतात विहिरीचे लेआउट टाकून देतो
असे सांगितले व त्यानंतर ले आउट सुद्धा टाकून दिले मात्र थोड्याच वेळाने कृषी विस्तार अधिकारी सोरटे यांचा कृषी अधिकाऱ्याला फोन येतो ती विहीर करू नका असे सांगतो. सोरटे यांच्या सांगण्यावरून कृषी अधिकारी सध्या वीर खोदू नका आपल्या तुक्या पूर्ण व्हायचे आहे तू त्या पूर्ण झाल्यानंतर वीर खोदकामात सुरुवात करा असे सांगून निघून जातो. वारंवार या शेतकऱ्याला पंचायत समितीचे उंबर्डे झिजवावे लागत असल्याने धनराज गजरे या शेतकऱ्याने २४ जानेवारी २०२४ रोजी  पंचायत समिती आष्टी समोर आमरण उपोषणाला सुरुवात केली असतानाही कृषी विभागाला जाग येत नव्हती आम्ही काही प्रतिनिधी तेथे गुंता सोडवण्यास गेलो असता समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने सिंचन विहिरीचा गुंता सुटणे कठीण झाले होते. काही वेळ लुटून गेल्यानंतर आष्टी पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी उपोषण मंडपाला भेट देत त्यांचे पूर्ण कागदपत्रे पाहून आपल्याला एम.आर. ई. एस. मधून विहीर देण्याचे कबूल केले. असता शेतकरी धनराज गजरे यांनी उपोषण मागे घेण्याचे ठरवले. उपोषण करते लाभार्थी धनराज गजरे यांना गटविकास अधिकारी प्रदीप चव्हाण, व पंचायत समिती कृषी अधिकारी दिलीप उखडकर यांनी नींबू पाणी देऊन उपोषण सोडवले.
याप्रसंगी पंचायत समितीचे अनिल नागपुरे,अडसड, आशिष होले,कर्मचारी तथा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी वाळवे उपस्थित होते.

नरेश भार्गव साहसिक न्यूज/24 आष्टी शहीद 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!