गव्हा कोल्ही पारधी बेडा येथे वॉशआउट मोहिम राबवून झालेली कारवाई
समुद्रपूर : २१ सप्टेंबर ठाणेदार एस.बी.शेगांवकर यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात पो.उप. नी.अनिल देरकर, डि.बी.पथकाचे पो.हवा. अरविंद येनुरकर, पो.ना. रवि पुरोहित, राजेश शेंडे, पो.अं. वैभव चरडे, रोशन उईके व गृहरक्षक दलाचे ताराचंद नौकरकार,योगेश चौधरी, हार्दिक जोगे, पंकज फुलझेले,प्रेमचंद नगराळे, चंद्रकांत जांगळेकर, मारोती डहाके यांनी गणपती बंदोबस्त दरम्यान पो. स्टे.समुद्रपूर परीसरातील गव्हा कोल्ही पारधी बेडा येथे २१ सप्टेंबर रोजी प्रभावी वॉशआउट मोहिम राबविली असता, मोहिमेदरम्यान पारधी बेड्यालगत असलेल्या झुडपी शिवारात सुरू असलेल्या गावठी मोहा दारूच्या रनिंग भट्टीवर कार्यवाही करीत ६१ लोखंडी व प्लास्टीक ड्रममधील ५,७०० लीटर मोहा सडवा रसायण, दोन प्लास्टीक कॅनमधील ६० ली. गावठी मोहा दारू व भट्टी साहित्य असा जु. किं. ३,१२,५०० रू.चा मुद्देमाल जप्त करून जागीच नाश केला.सदर मोहिमेदरम्यान आरोपी नामे 1) बेबी रविन राउत,वय ३६ वर्ष, 2) मनीषा जितून राउत,वय २७ वर्ष, 3) अमृता राजखन्ना पवार,वय २८ वर्ष सर्व रा.गव्हा कोल्ही पारधी बेडा, तह.समुद्रपूर यांचेवर दारूबंदी कायद्यान्वये कार्यवाही करण्यात आली.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक नुरूल हसन सा., अपर पोलीस अधिक्षक डॉ सागर कवडे सा., उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित सा.यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन समुद्रपूरचे ठाणेदार स.पो.नि. मा.एस.बी.शेगांवकर सा.यांचे निर्देशाप्रमाणे,पो.उप.नी. अनिल देरकर, पो.हवा.अरविंद येनुरकर, पो.ना. रवि पुरोहित,राजेश शेंडे, पो.अं. वैभव चरडे,रोशन उईके व गृहरक्षक दलाचे ताराचंद नौकरकार, योगेश चौधरी,हार्दिक जोगे,पंकज फुलझेले,प्रेमचंद नगराळे,चंद्रकांत जांगळेकर,मारोती डहाके यांनी केली.
ईकबाल पहेलवान सहासिक न्यूज-24