गिरड येथे वीज पडल्याने 20बकऱ्यांचा मृत्यू;

0

साहसिक न्यूज 24

इकबाल पहेलवान /हिंघणघाट :

गिरड परीसरात सर्वत्र जोरदार पाऊस हजेरी लावली गिरड येथे ढगफुटी सदृश पाऊसाला सुरूवात झाली यावेळी ३ वाजताच्या सुमारास बाबा फरीद दर्गा टेकडी परिसरात चरण्यासाठी गेलेल्या ५० ते ६० बकऱ्यांवर विज पडून यातील २० बकऱ्या जागीच ठार झाला यावेळी सुदैवाने मेंढपाळ थोडक्यात बचावला.मिळालेल्या माहितीनुसार १० जुलैला ३ वाजताच्या सुमारास गिरड परीसरात विज गर्जनासह जोरदार पाऊसाला सुरूवात झाली.याच वेळी गिरड येथील मनोज श्रीराम फोपारे हा मेंढपाळ बाबा फरीद टेकडी परिसरात आपल्या ५० ते ६० बकऱ्या चारत असतांनाच अचानक याठिकाणी विज कसळी यावेळी या कळपात २४ बकऱ्या जागीच ठार झाल्या मेंढपाळ मनोज हा याच ठिकाणी होता मात्र त्याने जमिवर लोटांगण घेतल्याने त्याचे प्राण वाचवले यासंबंधी मिळताच गिरड ग्रामपंचायत सरपंच राजु नौकरकर, उपसरपंच मंगेश गिरडे,मोहगांवचे सरपंच विलास नवघरे,माजी सरपंच विजय तडस, सामाजिक कार्यकर्ते अरुण मोटघरे यांनी घटनास्थळी भेट दिली. गिरड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली घटनेची माहिती मिळताच ठाणेदार सुनिल दहिभाते यांनी आपल्या कर्मचाऱ्यासह घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.या संबंधी तहसिलदार राजु रणवीर यांना सुध्दा माहिती देण्यात आली आहे.यावेळी अचनाक अशा पध्दतीने २४ बकऱ्यांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने मेंढपाळ मनोज फोपारे यांचे २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी मेंढपाळाने केली आहे.यावेळी गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात टेकडीकडे धाव घेतली होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!