गिरड शिवारात दुसऱ्या दिवशी वाघाचा दोन जनावरांवर हल्ला
साहसिक न्युज24
प्रमोद पाणबुडे/ वर्धा:
समुद्रपूर तालुक्यातील सावरखेडा येथील शेतकरी मनोज संभाजी थुटे यांच्या कालवडीवर हल्ला करून पट्टेदार वाघाने जागीच ठार केले. तर दुसरी घटना काही तासानंतर त्याच वाघाने खैरगाव येथील श्री हनुमान सिंघ छोयले यांच्या एका गाईंवर हल्ला करून जागीच ठार केले तसेच दुसऱ्या एका गावठी गाईला गंभीर जखमी केले.
या घटनेमुळे गिरड परिसरातील धोंडगावं, अंतरगाव, वडगाव, हिवरा, सावरखेडा, सावंगी,भवानपुर येथील शेतकरी व नागरिक, शेतमजुरी अत्यंत भयभीत झाले असुन शेतात कामावर जाणे दोन दिवसापासून बंद केले आहे, वनविभाग शनिवार पासुन सीरिअल किलर वाघाचा शोध घेत असुन अजुन पर्यंत यश मिळाले नाही, जनावरावर धोंडगाव येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रीतम दडमल यांनी जनावरावर उपचार केलेत तर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. या पट्टेदार वाघाला लवकरात लवकर जेरबंद करावे अशी मागणी गावकऱ्यांन सह शेतकऱ्यांनी केली आहे.