ग्रामसेविकीने विश्वासात न घेतल्याने २९ डिसेंबर पर्यंत घरकुल योजनेची कार्यवाही थांबवा….

0

नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच सुनिल साबळे यांचे गटविकास अधिकारी यांचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन

२८ नोव्हेंबर रोजी ठिय्या आंदोलन करूनही गटविकास अधिकारी यांनी केले सरपंचाचे मागणी कडे दुर्लक्ष

आष्टी (शहीद): येथुन नजीकच असलेल्या लहान आर्वी ग्रामपंचायतची नुकतीच ५ नोव्हेंबर रोजी निवडनुक होऊन ६ नोव्हेंबर रोजी लागलेल्या निकालात भाजपाचे आष्टी तालुका सरचिटणीस सुनिल साबळे हे आठ सदस्यांनसह निवडुन आले. येथे ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका कु. अनुराधा धारपुरे यांनी घरकुलची ग्रामसभा घेतली. यात ग्रामसभा घेतांनी बाहेरील अंतोरा रोडवरून हात धरू धरू सह्या घेऊन कोरम पुर्ण केला अशी गावकऱ्यांनी नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच सुनिल साबळे यांच्या कडे तोंडी तक्रार केली.यामुळे लहान आर्वी आणि लिंगापुर येथील लाभार्थीं ग्रामसभेत नसल्यामुळे आपण नेमके कोणत्या यादीत आहोत हेच माहिती नसल्याने त्या लाभार्थींनी सुध्दा नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच सुनिल साबळे यांच्या कडे फोनवर चर्चा केली. मात्र ग्रामसेविका कु. अनुराधा धारपुरे यांनी नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच सुनिल साबळे यांना आणि ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सर्वच सदस्यांना घरकुल योजनेविषयी कोणत्याही प्रकारची माहिती दिली नसल्यामुळे सरपंच सुनिल साबळे हे दिनांक २८ नोव्हेंबर रोजी पंचायत समिती आष्टी येथे गटविकास अधिकारी बाळासाहेब यावले यांच्या कडे घरकुल योजनेची अंमलबजावणी करण्याच्या प्रक्रियेची विचारणा करण्यासाठी अंदाजे २५० घरकुल लाभार्थ्यांनसह गेले. मात्र गटविकास अधिकारी बाळासाहेब यावले हे जिल्हा परीषद मध्ये मिटींगला गेले होते. गटविकास अधिकारी नसल्याने ग्रामसेविका कु.अनुराधा धारपुरे यांनीच पंचायत समिती येथे येऊन घरकुल लाभार्थ्यांना सविस्तर माहिती द्यावी यावी अशी मागणी नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच सुनिल साबळे यांनी एक दिवसीय प्रभारी गटविकास अधिकारी दिलीप उखळकर यांच्या कडे केली.मात्र ग्रामसेविकेला बोलाविण्यास पंचायत समिती प्रशासनाला अपयश आल्याने सरपंच सुनिल साबळे यांनी आक्रोश करून लाभार्थ्यांनसह संध्याकाळ पर्यंत ठिय्या आंदोलन केले. नंतर गटविकास अधिकारी बाळासाहेब यावले यांनी ग्रामपंचायत मध्ये येऊन पुन्हा विद्यमान कमेटी आणि नवनिर्वाचित कमेटीचे उपस्थितीत आपण ग्रामसभा घेऊन घरकुल योजनेची अंमलबजावणी प्रक्रियेची सविस्तर माहिती देऊन घरकुल यादीचे वाचन करू आणि तो पर्यंत घरकुलचे कागदपत्रे घेने थांबविण्यात येईल अशा प्रकारचे आश्वासन दिल्या नंतरच सर्व घरकुल लाभार्थी आप आपल्या घरी निघून गेले. मात्र त्यानंतर गटविकास अधिकारी बाळासाहेब यावले यांनी कोणत्याही प्रकारची भुमिका निभावली नसल्यामुळे आणि तसेच नवनिर्वाचित ग्रामपंचायत कमेटीसह लहान आर्वी व लिंगापुर येथील सर्व घरकुल लाभार्थी घरकुल योजनेच्या अंमलबजावणी बद्दल जैसे थे गोंधळात असल्याने सरपंच सुनिल साबळे यांनी पंचायत समिती गाठुन गटविकास अधिकारी श्री बाळासाहेब यावले यांच्या सह जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक श्री बीद तसेच जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रोहनजी घुगे यांना लहान आर्वी ग्रामपंचायत मधील घरकुल योजनेची अंमलबजावणी २९ डिसेंबर पर्यंत थांबविण्यात यावी अशी प्रत्यक्ष निवेदन देऊन मागणी नुकतीच केली.

गजेंद्र डोंगरे साहसिक न्यूज -24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!