घरात सापडलाय काडतुसासह देशी कट्टा

0

Byसाहसिक न्युज 24
प्रमोद पाणबुडे/ वर्धा:
पुलगाव येथे एकाच्या घरात तीन कडतुसासह देशी कट्टा आढळून आला आहे. पुलगाव पोलिसांनी केलेल्या झाडाझडतीत हा देशी कट्टा सापडून आला. सोमवारी दुपारच्या सुमारास पुलगाव येथील गाडगे नगर परिसरात ही घटना घडली आहे.
पुलगावच्या गाडगे नगर येथे राहणाऱ्या युधिष्ठीर थोरात याने आपल्या घरी देशी कट्टा बाळगला असल्याची महिती पुलगाव पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी पाळत ठेवली. नेमका देशी कट्टा बाळगण्याचे कारण काय. याचाही शोध घेण्यात आला. कट्टा बाळगण्याची परवानगी आहे काय याची खातरजमा केल्यावर युधीष्टीर थोरात यांच्या घराची झडती घेण्यात आली. झडती दरम्यान एक देशी कट्टा व तीन काडतुसे आढळून आली आहेत. पुलागाव येथील ठाणेदार शैलेश शेळके, उपनिरीक्षक चव्हाण, सहकारी खुशाल पंत राठोड, राजेंद्र हडके, मुकेश वंदिले यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. नेमका हा कट्टा आला कुठून हे शोधण्याचे आवाहन पोलिसांपुढे आहे. गेल्या दोन वर्षात वर्धा जिल्ह्यात अनेक ठिकाणी कट्टा आढळून आल्याच्या घटना घडल्या आहेत. पण नेमका देशी कट्टा खरेदी कुठून करण्यात आला, याची खुलेआम विक्री वर्धा जिल्ह्यात सुरू आहे काय यावर मात्र अजून पोलीस तपासात पडदा उघडल्या गेला नसल्याची चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!