चरखा गृह सेवाग्राम येथुन दिव्यांगाच्या मेळाव्यातुन हरविलेली दिवाग्य मुलगी नागपूर येथे मिळुन आली.
दि. 13/10/2023 रोजी पो.स्टे सेवाग्राम हद्दीत चरखा गृह सेवाग्राम येथे समाज कल्यान कार्यालय व जिल्हा परिषद तर्फै अपंग व मतीमंद लोकांचा मेळावाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये संपुर्ण जिल्यातुन दिव्यांग आल्याने प्रचंड गर्दी झाली होती. या मेळाव्यातच फिर्यादी रेहनाबी शेख चांद वय 60 वर्ष रा. पारडी ता कारंजा जि वर्धा हि तिच्या मतीमंद मुलगी रुकसाना परविन शेख चांद वय 37 वर्ष हिचे सह या मेळाव्यात आली होती फिर्यादी नोदनीच्या टेबलवर नोंदणी करित असतांनी त्यांची मतिमंद मुलगी कोणालीही न सांगता निघुन गेली अशा फिर्यादीचे तोडी रिपोर्ट वरून पो.स्टे सेवाग्राम येथे मिसींग क्र. 50/23 नोंद करून तपासात घेतला.
सदर मुलीचा शोध घेतला असता ती पोलीस स्टेशन परिसरात मिळुन आली नाही घटनेचे गांभिर्य लक्षात घेता पो.स्टे सेवाग्राम चे ठाणेदार चंद्रशेखर चकाटे यांनी सदर दिव्यांग मुलीच्या शोधा करिता विशेष पथक तयार करून शोध घेण्यास सुरवारत केली असता दि. 19/10/2023 रोजी सदर पथकास नागपूर येथे शोध कामी रवाना केले व सदर मुलगी ही नागपूर येथे सिताबर्डी परिसरात बस स्थानकच्या बाजूला मिळुन आल्याने सदर मुलीस पो.स्टे ला आणुन सदर मुलीस तिचे आई वडिलांचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधिक्षक सागर कवडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा श्री प्रमोद मकेश्वर, ठाणेदार श्री. चंद्रशेखर चकाटे याचे मार्गदर्शनता पो.उप.नि चव्हाण, सफौ दिलीप कडु, पोहवा हरिदास काकड पोना गजानन कठाणे, पोना मनोज लोहकरे मपोना योगिता जुमडे, पोशि अभय ईंगळे, पवन झाडे श्रेणी पोउपनि चालक कैलास चौबे यांनी केली
अविनाश नागदेवे सहासिक न्यूज-24 वर्धा