जय श्री रामाच्या जयघोषाने दुमदुमली सिंदी नगरी.

0

सिंदी शहरात कलश यात्राचे आयोजन

🔥 नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
🔥 कलश यात्रेचे शहरात जंगी स्वागत

सिंदी (रेल्वे) : येथील विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने भगवान श्रीराम अक्षता मंगल कलशाचे आयोजन करण्यात आले होते. ही मंगल कलश यात्रा स्थानिक रेल्वे फाटक खडकपूरा येथून सिंदी शहरातील विविध भागातून मार्गक्रमण करीत श्री. हनुमान मंदीर येथे पोहचली. या यात्रेचे विविध ठीकाणी पुजन करण्यात आले. या मंगल कलश यात्रे सोबत मोठ्या संख्येने दुचाकीस्वार युवक हातामधे भगवा ध्वज घेऊन जय श्रीरामाच्या घोषणा लावीत होते. दरम्यान, शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे अक्षत कलशाचे दर्शन करण्याचे सौभाग्य सिंदीकरांना लाभलेस्थानिक सार्वजनिक हनुमान मंदीरामध्ये भगवान श्रीराम अक्षता मंगल कलश यात्रेचे समापन झाले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे संचालन ओमप्रकाश राठी यांनी केले. यावेळी १९९२ मधे कारसेवक म्हणून ज्यांनी कारसेवा केली असे कारसेवक जनक पालीवाल, अशोक पराते विशेष रुपाने उपस्थित होते. कारसेवक जनक पालीवाल यांनी यावेळी उपस्थितांना बोलतांना म्हणाले की, १९९० व १९९२ च्या कारसेवेमध्ये सिंदी वासीयांचा सहभाग होता. १९८९ मध्ये विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आयोजित शिलापुजनाचा कार्यक्रम सुद्धा सिंदी शहरातील श्रीराम मंदीरमध्ये झाला होता व शिलापुजन १९९० मध्ये आईदानजी पालीवाल, महादेव आंबटकर ही दोन विश्व हिंदू परिषदेचे पदाधीकारी कारसेवेसाठी अयोध्याला गेले होते. तसेच १९९२ मध्ये सिंदीवरून ११ कारसेवक अयोध्या येथे कारसेवेसाठी गेले होते. विशेष म्हणजे त्यापैकी जनक पालीवाल व अशोक पराते हे या कार्यक्रमात सामील होते.या मंगल कलश यात्रा सोहळ्यामध्ये रितेश पालिवाल सुधाकर घवघवे, मनोज पेटकर, जनक पालीवाल, अशोक पराते, आकाश गवळी, नानवटकर गुरुजी, पंडित दुबे, अनिल साखळे, दत्ता कोपरकर, राहूल घोडे, सागर बाबरे, जयंता बडवाईक, रामेश्वर घंगारे इत्यादी सामील झाले होते.

दिनेश घोडमारे साहसिक न्यूज-24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!