जळगाव येथे होणार सॉफ्ट टेनिस सीनियर अजिंक्यपद स्पर्धा.

0

 सागर राऊत

वर्धा सॉफ्ट टेनिस असोसिएशन तर्फे नुकताच वर्धा जिल्ह्याच्या सॉफ्ट टेनिस संघ जाहीर करण्यात आला. मुलांच्या संघाचा कर्णधार सागर राऊत तर मुलींच्या संघाच्या कर्णधार पदी गौरी जोशी यांची निवड संघटनेचे सचिव अनंत भाकरे यांनी केली. 19 ते 22 डिसेंबर या कालावधीत जळगाव येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सॉफ्टनेस स्पर्धेमध्ये वर्धा जिल्हा संघ सहभागी होणार आहे. मुलांच्या संघामध्ये सागर राऊत, तोहीर शेख, अथर्व अंभोरे, सक्षम काटवे, मोहित देवतारे ,अनुज देवतारे ,विवेक खराबे, सोहम भांडेकर तसेच मुलींच्या संघांमध्ये अदिती लामसोंगे ,अनुष्का डोळसकर ,भार्गवी मेघे, देवश्री राऊत ,यशस्वी राठोड,याचिका थेटे,अक्षरा नखाते, गौरी जोशी यांची निवड करण्यात आली. मुलींच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून भारती तिमांडे व व्यवस्थापक म्हणून रोशनी काटवे तसेच मुलांच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून निसार सय्यद व्यवस्थापक म्हणून साक्षी धुर्वे यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या खेळाडूंचे समीर देशमुख अध्यक्ष वर्धा सॉफ्ट टेनिस असोशियन यांच्यातर्फे स्वागत करण्यात आले व स्पर्धेकरिता शुभेच्छा देण्यात आल्या

          गौरी जोशी

सागर राऊत साहसिक न्यूज- 24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!