जाळून मारले की मारून जाळले अस्पष्ट: दारूच्या कारणावरून झाला होता वाद
नांदपूर येथील घटना
क्राईम प्रतिनिधी/ वर्धा :
क्षुल्लक कारणावरून झालेला वाद विकोपाला गेल्याने तीघांनी मिळून एका वृद्धाला जिवंत जाळले. यात वृ्द्धाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना आर्वी तालुक्यातील नांदगाव येथे सोमवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे . या प्रकरणी तीघांना संशयित म्हणून विचारपूस का मी ताब्यात घेतले आहे . अभिमान पखाले ६७ असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नूसार अभिमान पखाले याचा कौटुंबिक वाद झाल्याने महिनाभरापुर्वी त्याने घर सोडले होते. तो गावातील बबलू मारोती पखाले याच्या घरी काम करून राहत होता. दरम्यान आज मारोती पखाले यांच्या घरी दारूच्या पार्टीचे आयोजन केले होते. दरम्यान पैशाच्या कारणावरून झालेल्या वादात प्रमोद दाहट, मारोती पखाले, धर्मा पखाले यांनी अभिमान पखाले याचा खून करून मृतदेह जाळला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा येथे पाठविण्यात आला. या प्रकरणी रात्री उशिरा आर्वी पोलिस ठाण्यात कलम 302 34 भादवी नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी संशयीत प्रमोद दाहट, मारोती पखाले, धर्मा पखाले यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागिय पोलिस अधिकारी सुनिल साळूंखे करत आहे.
जाळून मारले की मारून जाळले अस्पष्ट
नांदगाव येथे पखाले यांच्या घरी मिळालेला मृतदेह जळालेल्या स्थितीत आढळून आला. त्याला जाळून मारले की मारून जाळले हे अद्याप अस्पष्ट आहे.मृतकाला याला आधी मारले त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याला जाळण्यात आले असावे असा प्राथमिक अंदाज पोलसांच्या वतीने वर्तविण्यात आला आहे. नेमके काय हे शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्या नंतरच कळू शकेल असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
……….