जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रारुप प्रभाग रचना प्रसिध्द
By vसाहसिक न्युज 24
प्रतिनिधी/ वर्धा :
वर्धा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रारुप प्रभाग रचना दि.2 जुन रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदर प्रारुप प्रभाग रचनेवर नागरिकांना हरकती किंवा सूचना करावयाच्या असल्यास दि.8 जुन पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील जमीन शाखेत नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचा-यांकडे कराव्या.
प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारुप प्रभाग रचनेवर जिल्हास्तरावर प्राप्त होणा-या हरकती सूचनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जमीन शाखेतील नायब तहसिलदार उदय पुंडलिक 9422884503, अव्वल कारकुन आदीनाथ कातखेडे 9049640555, वंदना अवचट 8007500602 व महसूल सहायक कोमल पोले यांचा 8275283406 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून हरकती व सूचना सादर कराव्या, असे निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी कळविले आहे.