ठोक भाजीपाला बाजाराची वेळ बदलून देण्याची कृउबा समितीला निवेदन देऊन शेतकऱ्यांची मागणी…
वर्धा : हे जिल्हय़ाचे ठिकाण असुन अगोदर बजाज चौकातील समोरील जागेत बाजार भरला जात होता. काही कारणास्तव धान्य बाजार बोरगाव मेघे या ठिकाणी बाजार स्थलांतरित करण्यात आला.कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये भाजीपाला बाजार हा सकाळी भरत असुन शेतकरी आपला माल सुद्धा सकाळीच विकायला आणतो. भाजीपाला अडते पर्यंत शेतकऱ्यांचा माल घेऊन जाणारा रोडच्या बाजूला किरकोळ भाजी विक्रेत्यांकडून अतिक्रमण केल्याने वाहने जाण्याकरता पुरेसा रस्ता उपलब्ध राहत नाही. परिणामी गाडी जाण्याच्या मार्गावरून किरकोळ भाजी विक्रेते व शेतकरी यांच्यात नेहमीच शाब्दिक चकमक उडते.भाजी विक्रेते हे स्थानिक असून शेतकरी हा खेड्यापाड्यातून माल विक्रीस आणत असतो. त्यामुळेच भाजी विक्रेते हे शेतकऱ्यांना अश्लील शिविगाळ करून हाणामारीची भाषा बोलतो. शेतकरी व भाजी विक्रेते हा वाद विकोपाला जाऊन संघर्ष निर्माण होवू नये, यासाठीच शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळातील सदस्यांची भेट घेवून ठोक भाजीपाला विक्री करण्याची वेळ बदलवून देण्याची मागणी केली. भाजीपाला विक्रीची वेळ सायंकाळी 6 ते सायंकाळी 10 पर्यंत करण्याची मागणी करत निवेदन दिले. येत्या चार दिवसात निर्णय घेण्याचे सुचविण्यात आले आहे. अन्यथा ठिय्या आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा उपस्थित शेतकऱ्यांकडून देण्यात आला.
गजेंद्र डोंगरे साहसिक न्यूज/24वर्धा