डोलारखेडा फाटा ते कुऱ्हा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे

0

पंकज तायडे / मुक्ताईनगर:

तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम भोगळ कारभार पुंन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून डोला रखेडा फाटा ते कुऱ्हा रस्त्याचे काम निविदे प्रमाणे होत नसून या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी होत आहे.
तालुक्यातील डोलारखेडा फाटा ते कुऱ्हा अंदाजी वीस किलोमीटरचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत होतं आहे. दरम्यान, या रस्त्याकडे देखील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याचे सपशेल दुलक्ष असल्याचे यावेळी डोलारखेडा गावातील गावाकऱ्यांनी णीच निर्शनास आणून दिले व होतं असलेल्या रस्त्याचे काम हे अधिकाऱ्यांची गैरहजेरी चा फायदा ठेकेदार कोणत्या पद्धतीने घेतात
हे देखील यावरून लक्षात आणून दिले आहे.
या रस्त्याची कामाची सुरवात झाल्यानंतर संबंधित ठेकेदारांनी डागडुगी करण्यात सुरुवात केरी त्यातही खाडी न वापरता वरचे वर डांबर न टाकता कच वापरून गड्डे भरले जात असल्याने गावाकरांचा संताप अनावर झाला होता. परंतु त्या वेळी ठेकेदार यांनी गावा समोरूम काँक्रितिकरण होणार असल्याचे भाकीत करीत गावाकऱ्यांना गप्प केले. परंतु दि.03/03/2022 रोजी डोळारखेडा फाटा पासून ते कुऱ्हा कडे
डांबरीकरण रस्त्याची कामाची सुरवात झाली यावेळी मात्र गावाकऱ्याचा संताप अनावर झाला व त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार फोन देखील केला परंतु या ठिकाणी एकही शाखा अभियंता कर्मचारी उपस्थित झालेले नाही या ठिकाणी तब्बर तीन ते चार तास गावाकऱ्यांनी आंदोलन करीत रस्ता हा शासनाच्या अस्तिमेट प्रमाणात करावी अशी मागणी केली आहे.या वेळी काही गावाकऱ्यांनी रस्त्याची थीकनेस मोजना ती 20 ते 25 एम एम इतकेच भरली तर ती 52 ते 65 एम एम इतकी असावी असीही गावकरांची मागणी आहे.
ईस्टतीमेटप्रमाणे काम करण्यात यावे अन्यता काम बंद करावे अशी मांगणी केली संबंधित कामगाराना केली.
ग्रामस्थांनी घातलेल्या वादामुळे नारायण नामक व्यक्ती त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दाखल झाले तसेच घटनेची माहिती करताच बहुजन मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढगे यांनी घटनास्थळी येऊन काम इस्टिमेट प्रमाणे न झाल्यास रस्ता रोको आंदोलचा इशारा दिला आहे गावकऱ्यांनी कामा ठिकाणी थांबून असेपर्यंतकाम व्यवस्थित होता ना दिसून येत होते प्रसंगी बहुजन मुक्ती मोर्चा चे जिल्हाध्यक्ष राहूल ढगे डोळाखेडा येथील शिवाजी वानखेडे, कडू कोळी, विनोद थाटे,विजेंद्र कोळी यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!