तलाठ्यांअभावी वाढला आर्वी उपविभागात भार? तलाठी करतो जिल्हाधिकारी कार्यालयात कारभार…!
साहसिक न्यूज 24,ब्यूरो वर्धा
प्रमोद पाणबुडे
वर्धा – जिल्हाच्या ग्रामीण भागातील महसुलाची सर्वाधिक धुरा सांभाळणारे पद म्हणजे तलाठी हे पद आहे. पण तलाठ्यांना साजावर कार्यरत ठेवण्याऐवजी जर इतरत्र कामात लावले जात असेल तर मग त्या पदाचा उपयोग काय अशीच विचारणा होते आहे. एकीकडे जिल्ह्यात तलाठी या पदाची संख्या कमी असल्याने एकाच तलाठ्यांकडे दोन ते तीन साजे दिले गेले असल्याची देखील उदाहरणे आहे. सर्वसामान्य, गोरगरीब व ग्रामीण जनतेला न्याय देण्यासाठी सतत गाव पातळीवर कार्यक्षम तालाठ्याची नेहमी मागणी केली जाते, पण आर्वी प्रांतात मूळ पदस्थापणेवर असलेल्या तालाठ्याला मात्र जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीय सहाय्यकाची जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात असलेले श्री. सुनिल कवडे हे मूळ आर्वी येथे तलाठी या पदस्थापनेवर आहे. त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीय सहाय्यक म्हणून नियुक्ती देण्यात आली. अमृत महोत्सव आणि अतिवृष्टी दरम्यान प्रोटोकॉल चुकल्याने तडकाफडकी तत्कालीन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्याकडून बदली करण्यात आली होती, जिल्हाधिकारी बदलताच लगेच कवडे यांना पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावण्यात आले, त्यांना नेमके बोलावले की त्यांनी जुगाड करून आपली बदली करून घेतली यावर सर्वत्र चर्चा होत आहे
वर्ध्यात नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा सुरू असतांना लोकप्रतिनिधीच्या प्रोटोकॉल मध्ये चूक झाल्याने हिंगणघाटच्या लोकप्रतिनिधी यांना कळविले नसल्याने त्या तलाठ्यांची थेट तक्रार मंत्रालयात करण्यात आली होती. त्यावर कारवाई करत तेव्हाचे जिल्हाधिकारी यांनी त्याची तात्काळ बदली केली होती. मात्र एका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने तो तलाठी जिल्हाधिकारी यांची बदली होताच पुन्हा वर्ध्यात आला. पण त्यांचा सेवा वळतीचा कोणताही आदेश नसल्याचं बोललं जातं होतं. त्यात देखील आता तडजोड करण्यात आली असल्याची सूत्रांची माहिती आहे. आपला सांजा सोडून वर्ध्याच्या कार्यालयात काय करतो? असा सवालच कार्यालयातील कर्मचारी देखील करायला लागले आहे.
तलाठी करतोय पेट्रोल पंपाच्या परवानगीचा व्यवहार?
वर्ध्याच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांची बदली होताच वर्ध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पेट्रोल पंप परवानगीचे कामाला गती आल्याचे दिसून येत आहे. याआधी जिल्हाधिकारी देशभ्रतार असतांना हे कामे थंडावली होती.. कारण या सर्व कामासाठी नियम टू नियम प्रोसेस करावी लागत होते. मात्र आता पेट्रोल पंपाच्या कामाला चांगलीच गती आली आहे. एकूण 37 पेटोल पंप करिता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गृह विभागात प्रकरणे प्राप्त झाली असल्याची माहिती आहे. यासर्व पंपाचा फाईल एक तलाठी पाहत असल्याचं तेथील कर्मचारी सांगतात आहे. त्यामुळे या तलाठ्याला कोणत्या अधिकाऱ्यांचा आशीर्वाद आहे? याला येथे कोणी जाणीवपूर्वक येथे आणले का? असा सवाल उपस्थित झाला आहे.
कर्मचाऱ्यांच्या प्रमोशनच्या बदल्यात झाली मालसुताई?
वर्धा जिल्ह्यात मागील महिन्यात कर्मचाऱ्यांच्या प्रमोशन च्या बदल्या करण्यात आल्या आहे. ज्यांना ज्यांना आपल्या मर्जीचा टेबल पाहिजे आहे त्यांना त्यांना माल मोजून द्यावा लागला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर ज्यांनी माल दिला नाही त्यांना इतर ठिकाणी बदली देण्यात आली आहे.त्यामुळे अनेक महिला कर्मचाऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वर्धेचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुराव्या निशी चार कर्मचारी तक्रार करणार असल्याचे ‘साहसिक न्युज 24’ ला सांगण्यात आले आहे.