🔥तान्ह्या पोळ्याला कौटुंबिक वादातून रक्तरंजित थरार; मुलाकडून बापाची निर्घृण हत्या.
घटनेनंतर मृतदेह घराबाहेर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आल्याने परिसरात खळबळ उडाली. माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पुलगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी वंदना कारखेले, ठाणेदार ढाकणे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पुलगाव येथील रुग्णालयात पाठविला.