तुरुंग अधीक्षकासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुक्ताईनगर / प्रतिनिधी:

मुक्ताईनगर तालुक्यातील कैद्याचा भुसावळच्या दुय्यम कारागृहात झालेल्या मारहाणीत मृत्यू झाल्या प्रकरणी तत्कालीन तुरुंग अधीक्षकासह चार तुरुंग रक्षकाविरोधात भुसावळ शहर पोलीस खुणाचा गुंन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
या संदर्भातील वृत्त असे की,चांगदेव येथील सुनील भागवत तारू वय 40 रा. चांगदेव, ता. मुक्ताईनगर यांना मुक्ताईनगर न्यायालयाच्या आदेशानुसार 29 फेब्रुवारी 2020 रोजी मुक्ताईनगर पोलिसांनी अटक केली होती. या नंतर न्यायालयाच्या आदेशानुसार तारू यांना भुसावळ दुय्यम कारागृहात हालवण्यात आले होते. येथे तुरुंग अधीक्षक आणि तुरुंग रक्षकांनी मारहाण केली होती.यामुळे त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता.
यानंतर सुनील तारु यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.येथे 4 मार्च 2020 रोजी त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात प्रारंभी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र शवविच्छेदन अहवालाच्या निष्कर्षा नंतर पोलिसांनी या प्रकरणी आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, याप्रकरणी मयताचे पत्नी मंगला सुनिल तारू वय 35 रा. चांगदेव, ता. मुक्ताईनगर यांनी भुसावळ शहर पोलिसात मंगळवारी दिलेल्या फिर्यादीनुसार तत्कालीन तुरुंग अधीक्षक नागनाथ महादेव भानोसे, तुरुंग रक्षक व हवालदार सुभाष बाबुराव खरे, हवालदार भानुदास निवृत्ती पोटे, सिताराम विठ्ठल कदम आणि अनिल श्रीराम बडगुजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन पडघन करीत आहेत. कायद्यांच्या मृत्यू प्रकरणी तुरुंग अधीक्षकांसह पाच कर्मचाऱ्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!